computer

आयआयटी मुंबईचा आगळावेगळा, तांत्रिक पदवीदान सोहळा!! प्रमुख पाहुणे, शिक्षक आणि विद्यार्थी सर्वांचे साकार झाले डिजिटल अवतार!!

सध्या सगळं काही व्हर्च्युअल सुरू आहे. मिटिंग्ज झूमवर होत आहेत, लेक्चर ऑनलाईन होत आहेत, एवढेच काय, आता पदवीदान समारंभसुद्धा ऑनलाईन होत आहेत. पण आयआयटी मुंबई एक पाऊल पुढे गेली आहे.

कोरोना संकटामुळे आयआयटी मुंबईचा ५८ वा वार्षिक पदवीदान समारंभ व्हर्च्युअल रिऍलिटीच्या माध्यमातून करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नोबेल विजेते शास्त्रज्ञ डंकन हलडेन हे या समारंभाचे प्रमुख पाहुणे होते.

त्यांना या समारंभात उपस्थित राहता येणे शक्य नसूनदेखील ते उपस्थित होते. तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे? सोपं उदाहरण द्यायचं तर सलमान खानच्या किक सिनेमामध्ये तो टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने आपले प्रतिरुप बनवून पोलिसांना गुंगारा देतो.

तो सिनेमा असल्याने तिथे स्क्रिप्टनुसार अतिशयोक्ती दाखवली जाते. पण आयआयटी मुंबईने व्हर्च्युअल रिऍलिटीच्या साहाय्याने चक्क सगळ्यांचे डिजिटल अवतार तयार केले. आणि हे सगळे प्रत्यक्षात घडत आहे असा भास त्यातून निर्माण केला.

म्हणजेच सगळे विद्यार्थी, शिक्षक प्रमुख पाहुणे उपस्थित राहून समारंभ पार पडून, सगळ्यांनी मान्यवरांच्या हस्ते पदवी घेतली असे त्यात दिसत आहे. संस्थेने अशाप्रकारे जवळपास २ तासांचा समारंभ घडवून आणला.

हे घडवून आणण्यासाठी २० लोकांच्या टीमने जवळपास २ महिने मेहनत घेतली आहे. पण ज्या प्रकारे या त्यांच्या भन्नाट प्रयोगाचे सगळीकडे कौतुक होत आहे. त्यावरून त्यांची मेहनत फळाला आली असेच म्हणावे लागेल...

सबस्क्राईब करा

* indicates required