computer

इंटरनेटचा हिरो हरामी बोक्याचं झालंय निधन...त्याच्याबद्दल या गोष्टी माहित आहे का ?

मंडळी, फेसबुकवर हरामी बोका नावाचे बरेच पेजेस सापडतील. या पेजेसच्या प्रोफाईल पिक्चरवर एका बोक्याचं तोंड असतं. हा बोका काहीसा असा दिसतो.

तर, आता डोक्यातली ट्यूब पेटली का ? हे थोबाड तुम्ही नक्कीच बघितलं असणार. आता तुम्ही म्हणाल की आज या बोक्याची आठवण का काढली. तर, तशी वेळच आली आहे राव. या बोक्याची आपल्या सगळ्यांनाच आठवण काढावी लागणार आहे, कारण नुकतंच तो देवाघरी गेला आहे.

मंडळी, या बोक्याचं नाव होतं “तार्दार साउस” उर्फ तार्द. तो त्याच्या काहीश्या कंटाळलेल्या आणि रागीट चेहऱ्यासाठी प्रसिद्ध होता. आपण त्याला हरामी बोका म्हणतो पण तो जगभर “Grumpy Cat” नावाने प्रसिद्ध होता. थांबा थांबा !! अहो, होता नाही होती. हा बोका नव्हता तर मांजर होती राव.

तर, ती प्रसिद्ध झाली २०१२ साली. तिचा एक फोटो रेडीटवर पोस्ट करण्यात आला होता. थोड्याच दिवसात ती व्हायरल झाली आणि पुढे तर तिला सेलिब्रिटीचा दर्जा मिळाला. आजही GIF, मिम्स मध्ये तिचा चेहरा दिसतो. हे तर काहीच नाही. तिचा स्वतःचा ब्रँड आहे. तिच्या नावे आजवर टी-शर्ट, पुस्तकं, व्हिडीओ गेम्स आले आहेत. तिची कमाई लाखोंच्या घरात होती.

ती गेली तेव्हा तिचं वय होतं ७ वर्ष. अमेरिकेतल्या ज्या कुटुंबाकडे ती होती त्यांनी अधिकृतपणे Grumpy च्या ट्विटर अकाऊन्टवरून ही माहिती दिली आहे. तबाथा ही तरुणी स्वतःला तिची आई म्हणायची. तिच्याच हातात Grumpy ने शेवटचा श्वास घेतला.

तर मंडळी, Grumpy या जगातून निघून गेली आहे, पण तिचा चेहरा पुढील अनेक वर्ष आपल्याला हसवत राहील.

सबस्क्राईब करा

* indicates required