computer

बुद्धाची ही शिकवण तुमचं आयुष्य सुखी करेल, तुम्ही यातलं कायकाय करता?

तत्वज्ञ, सुधारक आणि जगाला शांतीचा मार्ग दाखवणारे गौतम बुद्ध यांची आज जयंती. जगभरात बुद्ध जयंती बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. बुद्धाच्या शिकवणीवर आधारीत बौद्ध धर्म जगाला प्रज्ञा, शील आणि करुणेची शिकवण देत असतो. म्हणूनच आज बौद्ध धर्म जगातल्या प्रमुख धर्मांपैकी एक आहे. चीन, जपान, श्रीलंकासहीत जगातल्या दहा देशांमध्ये बुद्ध धर्म प्रमुख धर्म आहे. 

मित्रांनो बुद्ध पौर्णिमेनिमित्त आज आपण भगवान बुद्धाच्या काही शिकवणी बघणार आहोत. भगवान बुद्धाच्या या विचारांनी लाखो लोकांचे आयुष्य बदलले आहे. 

- एक जळणारा दिवा दुसऱ्या हजारो दिव्यांना प्रकाश देतो. तरीसुद्धा त्याचा प्रकाश कमी होत नाही. त्याचप्रमाणे सुख वाटण्याने कमी होत नाही, तर अजून जास्त सुख आपल्या वाट्याला येते.

- तुम्हाला तुमच्या रागामुळे शिक्षा नाही,  तर तुम्हाला तुमच्या रागाकडूनच शिक्षा मिळते. म्हणजे राग, संताप करून आपण स्वतःच्या दुःखात भर घालत असतो.

- बाहेरील जगात हजारो लढाया जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय प्राप्त करा. स्वतःवर विजय मिळवलेल्या माणसाला कुणीच हरवू शकत नाही. हा विजय तुमच्यापासून कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. ना देवदूत ना राक्षस!

- वाईट विचारांनी वाईट विचार संपत नाहीत. वाईटाला फक्त प्रेम संपवू शकते. हे एक शाश्वत सत्य आहे.

- सत्याच्या मार्गावर चालणारा व्यक्ती फक्त दोन चुका करू शकतो. 
एक म्हणजे पूर्ण रस्ता निश्चित न करणे
दुसरी म्हणजे सुरुवातच न करणे.

- भूतकाळात रमू नका, भविष्याच्या स्वप्नात हरवू नका, वर्तमानावर ध्यान द्या, सुखी राहण्याचा तो एकमेव मार्ग आहे 

- तीन गोष्टी कधीच लपून राहू शकत नाहीत.
१) सूर्य २) चंद्र ३) सत्य.

- संताप करणे म्हणजे आगीचा गोळा दुसऱ्यावर फेकण्याचा इच्छेने स्वतःच्या हातात धरून ठेवण्यासारखे आहे. तो सर्वात आधी तुम्हालाच जाळतो.

- सुखाचा कुठलाच मार्ग नाही, सुखी राहणे हाच एक मार्ग आहे.

-  जो माणूस स्वतःवर खऱ्या अर्थाने प्रेम करतो तो दुसऱ्याला कधीच दुःख देऊ शकत नाही 

- आपण जसा विचार करतो आपण तसेच बनत जातो. ज्या गोष्टीची आपण कल्पना करतो तीच गोष्ट आपण निर्माण करत असतो.

मंडळी, बुद्धाच्या अफाट शिकवणीपैकी या महत्वाच्या शिकवणी प्रत्येकाने आत्मसात केल्या तर त्यांचे जीवन बदलून जाईल. आज बुद्ध पौर्णिमेनिमित्ताने बुद्धाची शिकवण आत्मसात करण्याचा संकल्प करूया. तुमच्या मित्रांनासुद्धा बुद्धाच्या शिकवणीचा लाभ व्हावा म्हणून हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करा.

 

आणखी वाचा :

आणि बुद्ध हसला.. जाणून घ्या भारताच्या पहिल्या यशस्वी अणूचाचणीविषयी काही गोष्टी..

लाफिंग बुद्धा आणि त्याची भलीमोठी झोळी...वाचा ही नक्की काय गोष्ट आहे !!

बुध्द पौर्णिमा - वैश्विक विचारक्रांतीचा दिवस

सबस्क्राईब करा

* indicates required