मोठ्यांनो, शिका जरा या मुलांकडून !आज अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर अर्थसाक्षर होण्याचा संकल्प करा !

आज सकाळी एटीएममधून पेन्शन काढायला गेलो होतो.आत कोणीही नाही असं समजून दरवाजा ढकलला.
आत एक बाबा आणि एक छोटी मशिनकडे डोळे लावून बसले होते.
मला आत येताना बघितल्यावर छोटी एकदम उसळून म्हणाली 'आजोबा, बाहेर थांबा. आम्ही पैसे काढतोय ना ! आम्ही बाहेर आलो की तुम्ही आत यायचं'
एरवी मला राग आला असताही पण आज भयंकर आनंद झाला.या छोट्या वयात पण त्या छोटीला पैशाच्या व्यवहाराची समज आहे हे बघून ज्याम बरं वाटलं. 
मोठ्यांनो, शिका जरा या मुलांकडून !आज अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर अर्थसाक्षर होण्याचा संकल्प करा !  

सबस्क्राईब करा

* indicates required