करण जोहरला झालं जुळं. वाचा, तो या नव्या जबाबदारीबद्दल काय म्हणतो ते..

आता तुषार कपूरच्या पाठोपाठ आणखी एक बाबा फिल्म इंडस्ट्रीत आलाय. कोण? आपला करण जोहर हो..

गेले वर्षभर तो मुलाखतींमधून त्याला बाबा व्हायचंय हे सांगत होता आणि  तसं त्यानं त्याच्या आत्मचरित्रातही लिहिलं होतं. बाळांच्या जन्मानंतर तब्बल महिन्याभरानंतर ही बातमी बाहेर आलीय. असं म्हणतात की महापालिकेत जन्ममृत्यूची नोंद होते, तिथून ही बातमी  फुटली. मग काय, लागले सगळे मिडियावाले करणच्या मागे त्याचा बाईट घ्यायला. म्हणून मग करणने सरळ एक प्रसिद्धीपत्रक काढून ही बातमी खरं असल्याचं म्हटलंय. 

स्त्रोत

या मुलांची नावं करणनं खूप विचारपूर्वक ठेवली आहेत. मुलाचं नांव आहे यश- करणच्या बाबांचंच नांव, आणि मुलीचं नांव आहे रूही.  त्याच्या आईचं नांव  आहे हिरू. तेच जर उलट बाजूने वाचलंत, तर ते रूही होतं. यावरूनच त्याचं त्याच्या आईवडिलांवर किती प्रेम आहे हे दिसून येतं. त्याचं प्रसिद्धीपत्रक वाचलंत, तर त्याने हा निर्णय किती विचारपूर्वक घेतलाय ते दिसतं. तो म्हणतो," या नव्या जबाबदारीसाठी त्यानं मानसिक, शारिरीक, भावनिक आणि इतरही लागणारी सगळी तयारी केलीय. माझी मुलं ही माझं काम, प्रवास आणि इतर सामाजिक जबाबदार्‍या यांच्यापेक्षाही महत्वाची आहेत.  आणि त्याच्या आईची नातवंडं सांभाळायला मदत तर होणार आहेच".

त्यानं पत्रकात त्या अनामिक सरोगेट मातेचे आणि ही सर्व प्रक्रिया पाडणार्‍या डॉ. जतिन शाह यांचेही आभार मानलेयत. अर्थात हे सगळं सायन्सच्या मदतीनं शक्य झालंय त्यामुळं तो वैद्यकीयशास्त्राचाही आभारी आहे. 

पण म्हणजे अंधेरीतलं मसरानी हॉस्पिटल अशा सरोगेट जन्मांसाठी प्रसिद्ध असल्याचं दिसतंय.  करणची ही जुळी मुलं, शाहरूखचा अबराम आणि तुषारचा लक्ष्य ही सगळे तिथंच सरोगसीद्वारे जन्माला आले आहेत. 

करण त्याच्या वेगळेपणामुळं तसाही इंडस्ट्रीत प्रसिद्ध आहे. आजचं त्याचं प्रसिद्धीपत्रक तो किती खोलवर विचार करणारा आहे हे ही दाखवून देतंय. करणला बाबा बनल्याबद्दल बोभाटा.कॉमच्या शुभेच्छा आणि पुढच्या जबाबदार्‍यांसाठी ऑल द बेस्ट!!!

 

आणखी वाचा- कुंवारा बाप-तुषार कपूरला मुलगा झाला.

सबस्क्राईब करा

* indicates required