पुण्यात बिबट्याच्या ५ पिल्लांना जिवंत का जाळण्यात आलं ??

गेल्याच महिन्यात पुण्याजवळच्या एका गावात बिबट्याचं पिल्लू सापडलं होतं. या पिल्लाची त्याच्या आईपासून ताटातूट झाली होती. वनविभागाने त्याची वैद्यकीय चाचणी करून त्याला त्याच्या आईकडे सोपवलं होतं. नुकतीच अशीच एक घटना घडली. बिबट्याची ५ पिल्लं पुण्याच्या एका गावात आली होती., पण ही पिल्लं तेवढी सुदैवी नव्हती.

पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी येथील ही घटना आहे. शेतात काम करणाऱ्या मजुरांनी शेतात घोणस साप पाहिला होता. घोणसला मारण्यासाठी त्यांनी शेतातल्या पालापाचोळ्याला आग लावली. आग विझल्यानंतर त्यांनी पाहिलं तर आगीत बिबट्याची ५ पिल्ले भस्मसात झाली होती. ही पिल्लं अवघ्या १० दिवसांची होती.

आगीत बिबट्याची पिल्लं आहेत हे समजल्यानंतर वनविभाग आणि पोलिसांना बातमी देण्यात आली, पण जोवर मदत पोहोचली तोवर पिल्लांचा जीव गेला होता. शेतात बिबट्या असल्याचं आम्हाला माहित नव्हतं असं मजुरांचं म्हणणं आहे.

स्रोत

पिल्लांची आई पिल्लांच्या शोधात फिरत असेल या भीतीने वनविभागाने मजुरांना शेतात जाण्यास बंदी घातली आहे.

मंडळी, जंगलतोड आणि त्याचे होणारे भयानक परिणाम याचं हे आणखी एक उदाहरण !!

सबस्क्राईब करा

* indicates required