computer

तिच्या तेवीसाव्या आणि त्याच्या एकूणतिसाव्या लग्नाची गोष्ट-अशीही असते एका लग्नाची गोष्ट

मंडळी, लग्न म्हटलं की 'पवित्र बंधन', 'एक चुटकी सिंदूर', 'जनम जनम के फेरे', 'मै तुलसी तेरे आंगन की' वगैरे फिल्मी डायलॉग आठवायला लागतात. आपल्या ज्या वाचकांची लग्न पार पडली आहेत त्यांच्या मनात  कांदेपोहे, बैठक, सुपारी, मानपान, पाहुणे सोयरे,  रुसव्याफुगव्यांसकट सगळ्या आठवणी मनात ताज्या असतील आणि ज्यांची झाली नसतील त्यांना आतापर्यंत कळलं असेलच की त्यांचं लग्न  जमणं हे आयुष्यातलं सर्वात मोठ्ठं चॅलेंज आहे. पण आज ज्या जोडप्याची गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्यांचं लग्न  जगावेगळंच होतं. हे त्या बाईंचं तेवीसावं लग्न होतं, तर होणार्‍या नवर्‍याचं एकोणतिसावं लग्न होतं!! अर्थातच हे लग्न भारतातलं नव्हतं हे वेगळं सांगायला नकोच. 
चला तर, आपण ओळख करून घेऊ या लिंडा वूल्फ आणि ग्लीन वूल्फ या जगावेगळ्या जोडप्याबद्दल!! 

आधी ओळख करून घेऊ लिंडा वूल्फची !

लिंडा वूल्फचं पहिलं लग्न झालं १९५७ साली. तेव्हा ती फक्त १६ वर्षाची होती. तिचं पहिलं लग्न सर्वात जास्त दिवस, म्हणजे ७ वर्षं टिकलं. पहिला घटस्फोट झाला आणि बाईच्या मागे काय पनवती लागली देव जाणे. पण त्यानंतर ती एकामागून एक लग्नं करत सुटली आणि मोडत पण गेली. 
तिचे २ नवरे गे (समलिंगी) निघाले. अजून दोन नवऱ्यांकडे घर नव्हते म्हणून त्यांना सोडले. एकाला एका डोळ्याने दिसत नव्हते, तर एकाने तिच्या फ्रीजवर टाळं ठोकलं. अशाप्रकारे प्रत्येकात काही ना काही वैगुण्यं तिला दिसली आणि तिचे लग्न काय टिकेना राव!!! मग तिने प्लम्बर, बारटेंडर, संगीतकार, एवढेच काय, पण एका धर्मगुरूशी पण लग्न केले. काही लग्ने तर फक्त ३६ तासांसाठीच टिकली. ती सांगते की तिला बऱ्याच लोकांमध्ये तिच्याबद्दल प्रेम नाही असे दिसले आणि म्हणून तिने त्यांना सोडले.  बाईची गंमत एवढी भारी की एकाच माणसासोबत तिने तीनदा लग्न केले होते. आता ती वयाच्या सत्तरीत आहे. पण त्यामुळे केलेल्या नवर्‍यांची नावं पण धड आठवत नाही असं ती म्हणते. 

आता ओळख करून घेऊ या तिच्या शेवटच्या नवर्‍याची म्हणजे ग्लीन वूल्फ ची !!

ग्लीन वूल्फला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव येण्यासाठी अजून एका लग्नाची आवश्यकता होती. म्हणून त्याने लिंडाला लग्नासाठी गळ घातली. हे  लग्न म्हणजे  एक पब्लिसिटी स्टंट होता. लग्नानंतर ती त्याच्या सोबत न राहता आपल्या घरी परत गेली आणि वर्षभरात घटस्फोटपण झाला .

तो गेला पण ती अजूनही लग्नाला तय्यार आहे

ग्लीन वूल्फचं नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आलं खरं पण घटस्फोटानंतर वर्‍शभरात तो मरण पावला तेव्हा त्याच्या अंत्यविधीला २९ बायका आणि ३० मुलं यापैकी कोणीही उपस्थित नव्हतं .  लिंडाचं अजूनही चे २४ वं लग्न झालं नाही पण योग्य वर मिळाला तर लग्न करायला तिची हरकत नाही असं ती म्हणते .
बघा , विचार करा, अमेरीकेत जायची ही पण एक संधी आहे .

सबस्क्राईब करा

* indicates required