या मुलीने लिहिलंय चक्क अभिषेक बच्चनला प्रेम पत्र !!!

हे फेसबुक आणि whatsapp आल्यापासून प्रेमपत्र किंवा ज्याला मराठीत लव लेटर म्हणतात त्याची मजाच नाहीशी झाली आहे बघा.. पूर्वी कसं लोकं प्रिये, प्रियतमे, लाडके असं लिहायचे.  आता तर प्रिये हा शब्द #प्रिये झाला आहे.

त्या पुस्तकातून चिठ्ठ्या देणं, निनावी पोस्ट कार्ड लिहिणं..  सगळं काही बाद झालं बघा! तर हे बेबी, बच्चा, सोनू, शोना, पिल्लू, माऊ, मनू, हब्बु, हब्बी, वायफी, लब्यु, असं कायाक्काय म्हणतात आता!
असो.. ज़माना कितीही बदलू देत.  पण आपल्या आवडत्या हीरो-हिरविणीला पत्र लिहायची फॅशन आहे तशीच आहे.

पोरी एकेकाळी राजेश खन्नाला स्वत:च्या रक्ताने पत्र लिहायच्या म्हणे! परिस्थिती आज ही फारशी बदललेली नाही. अभिषेक बच्चनच्या फॅनने लिहीलेलं एक पत्र आम्हाला मिळालं आहे! हे पत्र लिहिलंय देबोरती मोंडल नावाच्या एका मुलीने.

२००६ साली लिहिलेल्या पत्रात ती म्हणते, “मी तुझी मोठ्ठी फॅन आहे. मी ब्लफ मास्टर ३५ वेळा बघितला आहे आणि लवकरच ५० चा आकडा गाठेन. मी लवकरच कायदेशीर रित्या लग्नाच्या वयाची होईन, तेव्हा तू लवकर ये आणि आपण लग्न करू! माझे वडील टीसी आहेत. त्यांच्या मते तू पण टीसीचीच नोकरी कर.”

वर राजेश खन्नाची आठवण काढलीच आहे म्हणून सांगतो, ती शेवटी असंही म्हणते की तिला हे पत्र रक्ताने लिहायचं होतं पण...तिला सुईची भीती वाटते !!! (खूपच प्रामाणिक आहे बिच्चारी.)

मंडळी, हे पत्र तुम्हीच वाचा आणि करमणूक करून घ्या. बाय द वे, आम्ही हा पत्ता तपासला आहे  आणि तो अगदी खरा आहे.

तुम्ही कधी लिहिल्येत का अशी फॅन लेटर्स ???

सबस्क्राईब करा

* indicates required