computer

१२ व्या मजल्यावरून पडणाऱ्या मुलीला अचूक झेलणारा खरा सुपरमॅन !!

योगायोगाने घडलेले प्रसंग कधीकधी अतिशय वेगळा परीणाम करणारे सिद्ध होत असतात. व्हिएतनाममध्ये अशीच एक अजब घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. २ वर्षांची मुलगी १२ व्या मजल्यावरून खाली पडली, पण सुदैवाने खाली उभा असलेल्या डिलिव्हरी बॉयने तिला अलगद झेलून तिचा जीव वाचवला.

या ड्रायव्हरचे नाव ग्यूएन मान असे आहे. आपल्या गाडीत डिलिव्हरी करण्यासाठी बसलेला असताना  त्याने वरती लक्ष दिले, त्यावेळी त्याला १२ व्या मजल्यावर एक लहान मूल एक हात बाहेर काढून तरंगताना दिसले. त्याला पुढील धोक्याची जाणीव झाली.

वेळ वाया न घालता त्याने लागलीच इमारतीकडे धाव घेतली आणि बरोबर इमारतीखाली उभा राहिला. व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की, ती लहान मुलगी लगेच खाली पडली पण अचूक ठिकाणी उभ्या असलेल्या ड्रायव्हरमुळे ती बरोबर त्याच्या हातात पडली.

या सगळ्या घटनाक्रमावर बोलताना ग्यूएन मान म्हणाला की, 'मी सामान डिलीव्हर करण्यासाठी माझ्या गाडीत बसलेला असताना मला एका लहान मुलीच्या रडण्याचा आवाज आला, मी लगेच धाव घेत बरोबर ठिकाणी जाऊन उभा राहिलो. तिला बघून मला घरी असलेल्या माझ्या मुलीची आठवण आली. म्हणून मी कुठलाही विचार न करता तिथे धावून गेलो.

ती मुलगी येऊन थेट त्याच्या हातात पडेपर्यंत मात्र त्याचा जीव खालीवर होत होता, चुकून ती मुलगी थोडी जरी दुसरीकडे पडली असती तर होत्याचे नव्हते झाले असते. त्या चिमुकलीला थोडी दुखापत झाली असून ती उपचार घेत आहे.

हे पहिल्यांदाच घडत नाहीये. ग्यूएन मानने गेल्या वर्षी एका लहान बाळाला वाचवण्यासाठी आपल्या मोटर सायकलवरून उडी घेतली होती. तो व्हिडीओ देखील चांगलाच वायरल झाला होता.

सबस्क्राईब करा

* indicates required