computer

६८ सेकंदात ५० मिरच्या खाऊन या चीनी माणसाने केलाय विक्रम !!

मंडळी, जगात अनेक विचित्र स्पर्धा असतील. पण मिरच्यांच्या तलावात बसून मिरच्या खाण्याची स्पर्धा म्हणजे डोक्याला शॉट आहे. भाऊ, आम्ही चीनमधल्या स्पर्धेबद्दल बोलतोय जिथे मिरच्यांनी भरलेल्या पाण्यात बसून तिखटानं तोंड भाजणारी मिरची खावी लागते. हे एवढंच पुरेसं नसतं की काय म्हणून तिथलं वातावरणसुद्धा तापवलेलं असतं. एकंदरीत खालून आणि वरून दोन्हींकडून धूर काढायचा पूर्ण बंदोबस्त झालेलाअसतो.

स्रोत

अशा या अतरंगी स्पर्धेत एका व्यक्तीनं फक्त ६८ सेकंदात ५० मिरच्या खाऊन स्पर्धा जिंकली आहे. या बहाद्दराचं नाव आहे ‘तांग शुईहुई’. तो तिथलाच  स्थानिक रहिवासी आहे. जिथं एका मिरचीनं आपल्याला घाम फुटतो, तिथं या पठ्ठ्यानं ४० डिग्री उकाड्यात, मिरच्यांच्या तलावात ५० मिरच्या खाल्ल्या. बक्षीस म्हणून त्याला २४ कॅरेटचं सोन्याचं नाणं देण्यात आलं आहे.

स्रोत

ही स्पर्धा चीनच्या हुनान प्रांतात भरवली गेली होती. या स्पर्धेचं हे दुसरं वर्ष होतं. गेल्यावर्षी स्पर्धा जिंकणाऱ्याने ६० सेकंदात १५ मिर्च्या खाल्ल्या होत्या. पण यावर्षी एक नवा विक्रम झाला आहे.

मंडली, हुनान हा भाग तिथल्या तिखट पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे तिथे तिखट जहाल मिरच्यांची रेलचेल असते. स्पर्धेत  एका मिनिटात माणसाच्या डोळ्यातून पाणी काढतील अशाच मिरच्यांचा समावेश केला गेला होता. 

स्रोत

मग काय म्हणता, पुढच्यावर्षी ट्राय करणार का ?

सबस्क्राईब करा

* indicates required