व्हिडीओ ऑफ दि डे : हेल्मेट सक्तीला विरोध करणाऱ्यांनी हा व्हिडिओ एकदा बघाच !!

मंडळी, सध्या हेल्मेट सक्तीची चर्चा होत आहे. तुम्हालाही जर हा प्रश्न पडला असेल, की हे ट्राफिक पोलीस हेल्मेट सक्ती का करतात ? आणि त्यासाठी दंड का आकारतात ? तर हा व्हिडीओ तुम्ही एकदा बघाच.
Watch how Helmet helped him#roadsafety pic.twitter.com/cL1tpYK6XZ
— Raj Tilak Roushan, IPS (@rtr_ips) January 10, 2019
तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडीओ मध्ये नक्कीच मिळालं असणार. नागपूरचे वाहतूक विभागाचे DCP राज तिलक रौशन यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडीओची सुरुवात होते ती एक माणूस शॉर्टकट घेण्यासाठी ट्रकला ओव्हरटेक करतोय. पण या प्रयत्नात त्याचा तोल जातो आणि त्याचं डोकं ट्रकच्या टायर्सखाली येतं. पुढे तर तो प्रचंड ट्रक त्याच्या डोक्यावरून निघून जातो. पण हेल्मेट असल्याने त्याच्या डोक्याला कसलीही इजा होत नाही. शेवटी तर तो सुखरूप उठून उभा राहिला.
मंडळी, या व्हिडीओने हेल्मेट सक्ती का गरजेची आहे हे तर समजतंच, पण त्याच बरोबर तुम्ही कोणता हेल्मेट घेता याचंही महत्व समजतं. हेल्मेट घेताना ISI मार्क आहे की नाही हे बघितलं पाहिजे. शक्यतो रस्त्यावरच्या विक्रेत्यांकडून हेल्मेट विकत घेऊ नये.
तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं या बद्दल ? कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका !!