computer

रुटीनला कंटाळून त्याने जॉब सोडला आणि रिक्षा चालवायला घेतली...वाचा मुंबईच्या रिक्षाचालकाची कहाणी !!

स्वतःच्या मनाप्रमाणे जगता यायला हवे ही प्रत्येकाची इच्छा असते. पण ते सर्वांसाठी शक्य होत नाही. अनेकांनी मोठी स्वप्ने पाहिली असतात. पण वय, जबाबदाऱ्या आणि परिस्थितीमुळे बरेचदा माणसाला तडजोड करायला भाग पडते. माणसाला सगळ्यात जास्त काही छळतो EMI!!  अनेकांनी कर्ज काढलेले असते. हफ्ते चालू असतात. अशा परिस्थितीत त्यातून बाहेर पडणे शक्य होत नाही. 

पण,  अशा परिस्थितीतही काहीजण यातून बाहेर निघतात आणि स्वतःचे वेगळे विश्व निर्माण करतात. ते मग मोठे स्टार्टअप असू शकते किंवा छोटी वडापावची लॉरी!! आपले बॉस आपण स्वतः असावे फक्त याचसाठी तो अट्टाहास केलेला असतो.

आम्ही आज ऑफिस वर्कला कंटाळून थेट ऑटो चालवायला सुरुवात केलेल्या अशाच एका पठ्ठ्याची गोष्ट सांगणार आहोत. तो सांगतो की रोजच्या रोज तेच ते काम, तेच रुटीन. जीवनात जराही रस राहिला नव्हता, काम आनंदी होते अशातला पण भाग नाही, ना कुटुंबाला वेळ देता येत होत्या, ना स्वतःच्या हौसमौजा पूर्ण करता येत होत्या. म्हणून त्याने नोकरी सोडून रिक्षा चालवायचा निर्णय घेतला आणि आता तो सांगतो की तो खूप समाधानी आहे. आता मनाप्रमाणे तो काम करू शकतो. सणासुदीला घरी राहू शकतो. स्वतःचा बॉस स्वतःच असल्याचा वेगळाच आनंद तो सध्या अनुभवतोय.

मंडळी, हीच तक्रार प्रत्येक नोकरदाराची असते. पण नोकरी सोडण्याऐवढी रिस्क कोणी घेत नाही. या भावाने ती रिस्क घेतली आणि तो आता आनंदी आहे. 

त्याच्या या धाडसाचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे राव!! मंडळी ८ तास ड्युटी व्यतिरिक्तसुद्धा मोठे जग असते हाच संदेश त्या रिक्षा ड्रायव्हरने आपल्याला दिलेला आहे.

 

लेखक : वैभव पाटील

 

आणखी वाचा :

पुण्यात बनतील आता इ-रिक्षा : प्रवासी आणि मालवाहतूक, पण नो प्रदूषण...

ऑटो रिक्षाचं रुपडं पालटलं...आता मुंबईच्या रस्त्यांवर धावणार 'क्युट रिक्षा' !!