computer

या बेवड्याने रेनकोट समजून पीपीई कीट उचललं....पुढे काय घडलं वाचा !!

कोरोना आल्यापासून सगळीकडे पी पी इ (Personal Protection Equiment) किटची मागणी प्रचंड वाढली आहे. आंध्र प्रदेशातील वेटर्सपासून ते भोपाळच्या सलूनमधील कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वजण पी पी इ किट घालूनच आपले काम करत आहेत. नागपूरमध्ये मात्र या पी पी इ किटच्या नादात एक विचित्र घटना होऊन बसली आहे!!

तर झालं असं की एका भाजीवाला पिऊन टाईट झाला आणि मग हलतडुलत तो गटारीत जाऊन पडला. जखमी झाल्यामुळे त्याला उपचारासाठी नागपूरच्या मायो रुग्णालयात दाखल करण्यात आलं! प्रथमोपचारानंतर घरी परतताना रेनकोट समजून त्याने चक्क हॉस्पिटलमधील पी पी इ किटच उचललं! आणि घरी आल्यानंतर मित्राला सांगितलं की,"हा रेनकोट मी बाजारातून हजार रुपये देऊन खरेदी केला आहे!"

सकाळ टाइम्सच्या म्हणण्यानुसार त्याच्या जवळच्या लोकांना जेव्हा लक्षात आलं की त्याने रेनकोट समजून एक पी पी इ किट घातलं आहे तेव्हा त्यांनी लगेच नागपूरच्या आरोग्य विभागाला कळवलं. अधिकाऱ्यांनी लगेच ते किट जप्त केलं आणि जाळून टाकलं. त्याचबरोबर त्या तळीरामाची स्वाब टेस्ट घेण्यात आली. दुर्दैवाने त्यात तो पॉझीटीव्ह निघाला! त्याच्या संपर्कात आलेल्या त्याच्या नातेवाईकांना, मित्रांना ही बातमी कळवण्यात आली आणि त्यांचीदेखील टेस्ट करण्यात आली. सुदैवाने तो तळीराम सोडून बाकीच्यांचा टेस्ट रिपोर्ट निगेटीव्ह आला!

या कोरोनाकाळात आपण खूप जबाबदार आणि सावध राहणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्यामुळे कुणाचं आरोग्य धोक्यात येऊ नये, बरोबर ना?

सबस्क्राईब करा

* indicates required