आईस्क्रीम संपले म्हणून लग्न मोडलं

आज काल घरी संडास नाही म्हणून तिने लग्न मोडले अशा बातम्या नेहमीच वाचायला मिळतात. त्या बातम्यांतून पॉझिटीव्ह मेसेजही समाजाला मिळतो पण मथुरेत घडलेली घटना काहीशी वेगळी आहे. येथे लग्नाचे विधी झाल्यानंतर वर पक्षातले काही लोक जेवणाच्या मंडपात गेले असता त्यांना आईसक्रीम मिळालं नाही. या कारणास्तव त्यांचा वधू पक्षातील काही मंडळींसोबत वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. पोलिसांनी ऍक्शन घेऊन ही गडबड थांबवली पण तत्पूर्वी पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. वरपक्षातली मंडळी वधूला न घेता तशीच निघून गेली.

मानपमानाच्या आपल्या कल्पना अजूनही एवढ्या तीव्र आहेत कि आईस्क्रीमसारख्या क्षुल्लक कारणामुळेही लग्न मोडू शकते ह्यावर विश्वास सहज ठेवणे शक्य आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required