computer

लग्नात जेवायचं असेल तर हे करावं लागेल....जोडप्याने घातली एक भन्नाट अट !!

मंडळी, गावाकडं एक म्हण आहे ‘नवरदेव गेला नवरीसाठी अन वऱ्हाडी गेले जेवणासाठी.’ आपल्या सगळ्यांनाच माहित आहे लग्नाचं सर्वात मोठं आकर्षण असतं ‘जेवण’. पण समजा तुम्ही एका लग्नात गेला आहात आणि तिथे तुम्हाला गणितं सोडवायला लावली तर ? गुलाबजाम किती महागात पडेल राव.

मंडळी, एका जोडप्याने अशी भन्नाट अट घालून सगळ्यांना चकित केलं आहे. दोघेही गणितज्ञ आहेत आणि त्यांनी आपल्या लग्नालाही गणिती टच दिला आहे. त्यांनी शेअर केलेल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हटलंय की पाहुण्यांना संपूर्ण लग्नसमारंभात वेगवेगळी गणितं सोडवावी लागतील. उदाहरणार्थ, एखादा पाहुणा जेवणासाठी कोणत्या टेबलवर बसेल हे त्याने सोडवलेल्या गणितावर ठरणार आहे.

तुम्ही म्हणाल की अशा लग्नाला जाणार तरी कोण ? तर त्याचं असं आहे, या जोडप्याचे मित्रही गणितज्ञ आहेत. दोघेही मिळून आपल्या मित्रांच्या शोधनिबंधातले आणि त्यांच्या अभ्यासाशी संबंधित असलेले प्रश्न शोधून काढणार आहेत. हेच प्रश्न ते त्या त्या मित्रांना विचारतील. यासाठी दोघांनी मित्रांचे शोधनिबंध, गणितातील संशोधन या सगळ्यांचा अभ्यास सुरु केला आहे.

मंडळी, मोठमोठ्या पार्ट्या सेलिब्रेशन, व्हिडीओ, फोटोशूट या सगळ्यांना फाटा देत या जोडप्याने शोधून काढलेली आयडिया इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे.

आता तुम्हीच सांगा जर तुमच्या मित्राने/मैत्रिणीने अशीच अट घातली तर तुम्ही त्याच्या/तिच्या लग्नाला जाल का ?

 

 

सबस्क्राईब करा

* indicates required