कुंभमेळ्यात घरच्यांची ताटातूट टाळायची असेल तर हा कुंभ फोन तुमच्याकडे असायलाच हवा!!

मंडळी, पूर्वी कुंभच्या जत्रेत एवढी मुलं हरवली की त्यावरून सिनेमे निघाले. मनमोहन देसाई छाप ‘बिछाडे हुये भाई’ची कन्सेप्ट याच कुंभ मेळ्यावरून आली. आता यापुढे कदाचित तसं होणार नाही. कारण काळ बदलला आहे आणि सोबतीला जिओ आलं आहे. आता तुम्ही म्हणाल याचा जिओशी काय संबंध. राव, संबध आहे. चला समजून घेऊया !!

स्रोत

तर त्याचं असं आहे, जिओने ‘कुंभ जिओ’फोन लाँच केला आहे. या फोनला नवीन फोन समजण्याची चूक करू नका. हा फोन जिओचा तोच जुना फोन आहे, पण या जुन्या फोनला एक नवीन टच देण्यात आलाय. या फोन मध्ये कुंभ मेळ्यासाठी खास तयार करण्यात आलेले फीचर्स असतील. जसे की, कुंभ मेळ्यापर्यंत जाण्यासाठी बस, ट्रेन यांची माहिती, कुंभ मेळ्यात होणाऱ्या स्नानाची वेळ तसेच इमर्जन्सी हेल्पलाईन, इत्यादी.

या फोन मध्ये फॅमिली लोकॅटर नावाचं एक खास फिचर पण आहे. या फिचरमुळे कुटुंबातील सर्व सदस्यांचं लोकेशन मिळतं. म्हणजे कुंभच्या भल्यामोठ्या जत्रेत कोण कुठे आहे हे सहज समजेल. हरवण्याचा तर चान्सच नाही राव.

स्रोत

हा फोन फक्त ५०१ रुपयांमध्ये विकत घेता येईल, पण त्यासोबत ५९४ रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. या रिचार्जने ६ महिन्यांचा डेटा आणि कॉलिंग फ्री मिळणार आहे. फोन घेण्यासाठी जे ५०१ रुपये भरावे लागतील तेही रिफंडेबल असतील. एकूण काय ‘कुंभ जिओ’ ग्राहकांना कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त फायदा देईल.

तर मंडळी, कुंभ मेळ्याच्या निमित्ताने जिओसाठी एक भलंमोठं बाजारपेठ खुलं झालं आहे, पण हा फोन कितपत यशस्वी होईल ? तुम्हाला काय वाटतं ??

सबस्क्राईब करा

* indicates required