देशभक्ती दाखवण्यासाठी या तरुणाने केलाय हा हटके प्रयोग!!

मंडळी, अभिषेक गौतम नावाच्या तरुणाने देशभक्तीसाठी असं काही केलं आहे जे यापूर्वी कोणीच केलं नसेल. त्याने तब्बल ५६० हुतात्म्यांची आणि सैनिकांची नावे पाठीवर कोरून घेतली आहेत.

मंडळी, अभिषेकच्या शरीरावर तब्बल ५९३ टॅटू आहेत. यातले ५६० टॅटू हे भारतीय सैन्यातील शहिदांची आणि स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांची नावे आहेत. नावांसोबत स्वातंत्र्य लढ्यातील महत्वाच्या व्यक्तींचं चित्रही त्याने काढून घेतलं आहे. त्याने भारतीय सैन्याला मानवंदना म्हणून हे टॅटू कोरून घेतले आहेत.

स्रोत

त्याने या मागच्या मूळ प्रेरणेबद्दल सांगताना आपला एक अनुभव शेअर केला आहे. तो आणि त्याचा मित्र लेह-लडाखला गेलेले असताना भारतीय सैन्याने त्यांना सर्वोतोपरी मदत केली. एवढंच नाही, तर सैन्याने अभिषेकच्या मित्राचा जीव वाचवला होता. तेव्हाच अभिषेकने ठरवलं की भारतीय सैन्याला मानवंदना देण्यासाठी असा हटका प्रयोग करायचा.

५६० टॅटू कोरून घेताना त्याला वैद्यकीय अडचणी आल्या. डॉक्टरांचा तर याला पूर्ण विरोध होता, पण तो शेवटपर्यंत आपल्या विचारांवर ठाम राहिला आहे.

तर मंडळी, याला वेडेपणा म्हणाल की देशभक्ती ? तुम्हीच सांगा !!

सबस्क्राईब करा

* indicates required