बॉसला खूष करण्याचा मार्ग सिगारेटच्या धुरातून जातो??

सिगरेट ओढण्याची सवय असलेल्या मंडळींसाठी एक बातमी आली आहे. नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्चच्या सर्वेक्षणानुसार जे लोक आपल्या बॉस सोबत सिगरेट ओढतात त्यांना प्रमोशन लवकर मिळतं.
मॅनेजर पुरुष असल्यामुळे काम करणाऱ्या पुरुष कर्मचाऱ्यांना मिळणारे फायदे या विषयावर करण्यात आलेल्या संशोधनातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या अभ्यासात असं दिसून आलं की मालकाच्या आवडीनिवडी जुळणाऱ्या कर्मचाऱ्याला बढती लवकर मिळते. स्त्रियांच्या बाबतीतही असाच निष्कर्ष काढण्यात आला आहे. जर स्त्री कर्मचाऱ्यांची मॅनेजर पण एक स्त्री असेल तर त्यांना प्रमोशन लवकर मिळतं.
हार्वर्ड बिझिनेस स्कूलच्या झो कुलेन आणि यूसीएलए अँडरसन स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या रिकार्डो पेरेझ-ट्रुगलिया यांनी एका बड्या वित्तीय संस्थेवर संशोधन केलं होतं. या वित्तीय संस्थेतील कामकाजांवर, कर्मचाऱ्यांवर लक्ष केंद्रित करून वेगवेगळे निष्कर्ष काढले आहेत.
तर, काहीही म्हणा पण हे निष्कर्ष सर्वांनाच पटणारे नाहीत. तुमचा कामावरचा अनुभव कसा आहे? तुमचं मत द्या !!