या रे या, सारे या...मिसळ महोत्सवात जाऊया !!

मिसळप्रेमींना मिळणार आहे झणझणीत, तर्रीवाली, लज्जतदार अशा७० मिसळींची सलामी. आजपासून उद्या म्हणजे २१ जानेवारीपर्यंत ठाण्यात मिसळ महोत्सव भरवण्यात आला आहे. या महोत्सवात तुम्हाला तब्बल ७० प्रकारच्या मिसळी चाखता येणार आहेत भाऊ.

नेहमीच्या मिसळपेक्षा इथे वेगवेगळ्या व्हरायटी पाहायला मिळतील. जैन मिसळ, काळ्या-तांबड्या रस्स्याची मिसळ, खोबऱ्याची, चुलीवरची, अहमदनगर, पुणेरी, कोल्हापुरी मिसळ अशा संपूर्ण महाराष्ट्रभरातून निवडलेला मिसळी आपल्याला एकाच जागी मिळणार आहे.

स्रोत

एवढं झणझणीत तिखट खाल्यानंतर तुमच्या जिभेला शांत करण्यासाठी दही, ताक, चहा, कॉफी, ज्यूस, आईस्क्रीम, डेझर्टस, मोदक, खरकस, पुरणपोळी, कुल्फी, फालुदा इत्यादी मिष्टान्न देखील या महोत्सवात आहेत.

नंदकिशोर अडणाल यांनी या मिसळ महोत्सवाचं आयोजन केलं आहे. या मिसळ महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या मिसळींसाठी प्रसिद्ध असलेले विक्रेते ठाण्यात एका जागी जमा झाले आहेेेत आणि तब्बल २० मिसळींचे स्टॉल इथे उभारण्यात आले आहेत.

काय मग मिसळ प्रेमींनो...जाताय ना मिसळ महोत्सवात ? आधी पत्ता बघून घ्या राव...

पत्ता : घंटाळी देवी मैदान, नौपाडा, ठाणे (प), महाराष्ट्र.

 

आणखी वाचा :

पुण्यात झणझणीत आणि चटकदार मिसळ मिळण्याची ही २० अफलातून ठिकाणं...बघताय काय, व्हा सामील !!

सबस्क्राईब करा

* indicates required