computer

हरवलेली बाई स्वतःच तिच्या शोध मोहिमेत सामील कशी झाली?

(प्रातिनिधिक फोटो)

एखादा व्यक्ती हरवली तर त्याच्या जवळच्या लोकांची काय परिस्थिती होते हे ज्याचे नातेवाईक हरवले त्यांनाच माहीत.  सुरुवातीच्या काही तासांत  सगळे सगळी ताकद लावून त्या व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न करतात. पण मंडळी ज्याला तुम्ही शोधताय तोच जर तुमच्यासोबत त्याला स्वत:ला शोधू लागत असेल तर? खरं वाटत नाही ना?

पण मंडळी हे खरे आहे.  खरोखर ही गोष्टच तेवढीच विचित्र आहे राव!!  एलग्जा बेटावर ही घटना घडली आहे. झाले असे की काही प्रवाशांची टीम त्या बेटावर फिरायला गेली होती. हे बेट पायी चालण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. तर ही एशियन बाई टिकज्या बसमधून उतरून बेटावर फिरायला गेली पण निघण्याच्या वेळेपर्यंत आली नाही. ड्रायव्हरने ही गोष्ट सगळ्यांना कळवली आणि त्या महिलेची शोधमोहिम सुरू झाली. 

सगळेजण पाच फूट दोन इंच उंचीच्या काळे कपडे घातलेल्या एशियन बाईला शोधत होते. आपल्या काकूही त्या वर्णनाच्या बाईला शोधायला लागल्या. पण गंमत अशी झाली होती की मधल्या वेळात तिने कपडे बदलले होते. त्यामुळे "पाच फूट दोन इंच उंचीची काळे कपडे घातलेली एशियन बाई" कुणाला सापडेना. 

काही तास शोधमोहिम चालल्यावर सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला आणि ते स्वतःवरच हसायला लागले. सोशल मीडियावर मात्र या गोष्टीची खूप चर्चा झाली राव!! अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने या विचित्र पद्धतीवर मीम्सही शेयर केले.

 

लेखक : वैभव पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required