computer

जिओ फोन २, जिओ राउटर, जिओ टीव्ही....पाहा बरं अंबानी तात्यांच्या झोळीत आणखी काय काय आहे ते !!

मंडळी, आजच मुकेश अंबानी यांनी रिलायन्सच्या ४१ व्या वार्षिक बैठकीत नवीन ऑफर्स आणि प्रोडक्ट्सचा पेटारा उघडला  आहे. या बैठकीत त्यांनी कोणकोणत्या घोषणा केल्या त्याबद्दल जाणून घेऊया :
 

१. जिओ फोन २

या बैठकीत ‘जिओ फोन २’ या नव्या फोनची घोषणा करण्यात आली. हा फोन २,९९९ किमतीचा असणार आहे. ज्यांच्याकडे जिओचा फोन आहे ते जुन्या फोनच्या बदल्यात  ५०१ रुपयात नवीन फोन घेऊ शकतात.

जिओ फोन २ ची वैशिष्ट्य अशी आहेत :

१. ऑपरेटिंग सिस्टिम : KaiOS 
२. स्क्रीन 2.4QVGA
३. ५१२ एमबी रॅम  - ४ जीबी रोम
४. २ मेगापिक्सेल  rear camera आणि VGA front-facing camera
५. SD कार्ड   १२८ जीबी क्षमता
६. dual-SIM, LTE, VoLTE, and VoWi-Fi
७. एफएम, ब्ल्यूटूथ, जीपीएस, वायफाय, आणि एनएफसी.

इतकंच नाही, जिओच्या जुन्या आणि नव्या फोनमध्ये १५ ऑगस्टपासून फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि युट्यूब फुकट वापरता येणार आहे. मंडळी, आहात कुठं!!

२. जिओची स्मार्टहोम टेक्नॉलॉजी

जिओचा नवीन धमाका म्हणजे स्मार्टहोम टेक्नोलॉजीचा. जिओ १५ ऑगस्टपासून एक अॅप लाँच करणार आहे. या अॅपद्वारे घरातील उपकरणं तुमच्या आवाजाच्या इशाऱ्याने चालतील. म्हणजे सगळं काही तुमच्या कंट्रोलमध्ये राहील.

३. जिओ गिगा राउटर

रिलायन्सने महत्वपूर्ण ‘जिओ गिगा फायबर’ ही ब्रॉडबँड सेवा लाँच केली आहे. या ब्रॉडबँड सेवेचा वेग तब्बल १०० एमबीपीएस असणार आहे. पूर्वीपेक्षा स्वस्तात जास्तीत जास्त ‘फास्ट’ इंटरनेट सेवा मिळेल असा रिलायन्सचा दावा आहे.

विशेष म्हणजे ही ब्रॉडबँड सेवा सेटटॉप बॉक्ससहित मिळणार असल्याने इंटरनेटबरोबरच तुम्ही टीव्हीसुद्धा पाहू शकाल. या टीव्ही सेटटॉप बॉक्सचं नाव आहे ‘जिओ गिगा टीव्ही’. जिओ गिगा टीव्हीमध्ये ‘व्हॉईस कमांड’ फिचर मिळणार आहे. हे फिचर सर्व भारतीय भाषांमध्ये काम करेल.

 

मंडळी, भारतातल्या ११०० शहरांमध्ये या सर्व सेवा पुरवण्यात येणार आहेत. जिओच्या ‘जिओ गिगा फायबर ब्रॉडबँड’ सेवेमुळे घरातील प्रत्येक उपकरण जोडलं जाईल. त्या सोबतच नवीन जिओ फोनसुद्धा उपलब्ध होणार आहे. यासाठी आपल्याला फक्त १५ ऑगस्ट पर्यंत थांबावं लागेल. पाहूयात मग १५ ऑगस्टनंतर नक्की कसा होतो जिओ धमाका!!

सबस्क्राईब करा

* indicates required