शोभा डे ची पोलिसांनी काढली "शोभायात्रा"

           विनाकारण वाद ओढवून घ्यायची शोभा डेंची जुनी सवय काही जात नाही. ऑलिम्पिकच्या वेळेसही त्यांनी असंच काहीतरी ट्विट करून आपली 'शोभा' करून घेतली होती आणि बच्चन-सेहवागसारख्यांकडून भारी टोमणे ऐकून घेतले होते. 
          परवा मतदानाच्यादिवशी पण बाईंनी एक फोटो ट्विट केला- खुर्चीवर बसलेल्या एका जाडजूड पोलिसाचा. आणि वर म्हणाल्या, "मुंबई पोलिसांचा भरभक्कम बंदोबस्त"!!

          मग मुंबई पोलीस काय सोडतात काय? त्यांनीही उत्तर दिलं, "युनिफॉर्म आणि युनिफॉर्ममधला माणूस, दोन्हीही आमचे नाहीत. तुमच्यासारख्या लोकांकडून अधिक जबाबदारीने वागण्याची अपेक्षा आहे". आता तो फोटो आहे फॉरवर्ड, त्यातल्या पोलिसांच्या खांद्यावरच्या पट्ट्यांवर म.प्र.पु. असं स्पष्ट लिहिलेलं असताना वाचायचेही कष्ट न घेता शोभा डेंनी फोटो ट्विट करावा का?

 शोभा डे यांचं ट्विट आणि मुंबई पोलिसांचं प्रत्युत्तर (स्त्रोत


          दरम्यान हे मध्यप्रदेशातले पोलिस आहेत नीमच नावाच्या गावातल्या पोलीस ठाण्यातले इन्स्पेक्टर आणि त्यांचं नाव आहे दौलतराम जोगावत. त्यांनी म्हटलंय,"१९९३ मध्ये त्यांचं एक ऑपरेशन झालं, त्यानंतर त्यांच्या शरीरात इन्सुलिन वाढलं आहे. त्यामुळं त्यांचं वजन १८०किलोपर्यंत वाढलंय. हे अतिखाण्यामुळं नक्कीच झालेलं नाही. जर इच्छा असेल, तर शोभा दे मॅडम माझ्या उपचारांसाठी मदत करू शकतात.."
शोभा डेंनी यापुढं जरा विचार करूनच ट्विट करावं आणि शोभा करून घेऊ नये हेच खरं!!

सबस्क्राईब करा

* indicates required