थ्रील अनुभवण्यासाठी कर्नाटकातील या किल्ल्याला नक्कीच भेट द्या !!

भाऊ तुम्हाला थ्रील घ्यायला आवडतं का ?, उंचावर जाऊन खाली खोल दरीत वाकून बघायचं किंवा हरिहरगड सारखा किल्ला चढून जायचं, ट्रेकिंग, अॅड्व्हेंचर, ते अंगावर काटा येणं वगैरे वगैरे...राव यातलं काहीही करायला भीती वाटत (फाटत) असेल तरी कर्नाटकातील या ठिकाणी एकदा तरी नक्की भेट द्या....

स्रोत

चिकबल्लापूर, कर्नाटकातील अवलबेट्टा किल्ला हा त्याच्या एका ‘थ्रिलर पॉइंट’ साठी प्रसिद्ध आहे. या किल्ल्याच्या वरती ‘लक्ष्मी नारायणस्वामी मंदिर’ आहे. या मंदिराच्या मागच्या बाजूस एक लहानसं तळं आहे. आणि याच तळ्याच्या बाजूने दगडाचं एक निमुळतं टोक दरीच्या बाजूने निघालेलं दिसतं. चित्रात तुम्ही पाहूच शकता.

स्रोत

या ठिकाणाबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. ज्यांना थ्रील अनुभवायचा आहे असे अनेकजण इथे येत असतात. शिवाय संपूर्ण किल्ला पाहण्यासारखा आहे. अॅड्व्हेंचर आणि थ्रील एकाच जागी अनुभवायचं असेल तर अवलबेट्टा किल्ल्याला नक्की भेट द्या.

स्रोत

पण....जीवास धोका निर्माण होईल असं उगाच काहीही करू नका !!

सबस्क्राईब करा

* indicates required