वाचा या चरस पिकवणाऱ्या गावाबद्दल काही माहित नसलेल्या गोष्टी !!

Subscribe to Bobhata

भारतात दर किलोमीटरवर वेगळी भाषा, वेगळी माणसं आणि रीतीरिवाज दिसून येतात असं म्हटलं जातं. आज आम्ही अशाच एका हटके गावाची ओळख करून देणार आहोत. भारतातल्या या गावात आपले प्राचीन कायदे-कानून आहेत, संस्कृती आणि वेगळीच जीवनशैली आहे. चला तर मग जाऊया या गावात.. पण जरा जपून... या गावात कोणत्याही गोष्टीला शिवलं तर दंड भरवा लागेल भाऊ...

तर या गावाचं नाव आहे ‘मलाणा’. हिमाचल प्रदेशमधल्या कुल्लू घाटाच्या पूर्वेला वसलेलं हे एक टुमदार गाव. चारी बाजूने निसर्गाने मिठीत घेतलेलं. या निसर्गाला जपण्यात इथल्या लोकांचा मोठा हात आहे. जगात तंत्रज्ञान वेगाने पसरत असताना या गावात मात्र त्याची साधी हवा सुद्धा नाही.


स्रोत

येथील लोक स्वतःला अलेक्झांडरचे वंशज मानतात. खरं तर मलाणा वसवलं ‘जमलू’ नामक ऋषींनी. याच ऋषींनी इथले कायदे-नियम तयार केले आणि तेच कायदे आजही पाळले जातात. पूर्ण गावाचा कारभार ग्राम परिषद बघत असते. या ग्राम परिषदेतील ११ सदस्य कामकाज बघतात. ही शासन पद्धती ग्रीसच्या शासन पद्धतीसारखीच असल्याचं म्हटलं जातं.

 

गावात कोणालाही हात लावायचा नाही!!


स्रोत


स्रोत

शिवाशिव म्हटलं की आपल्याला जातपात आठवते.  पण या गावाचा कारभार अजब आहे. बाहेरून येणाऱ्या माणसाला तिथल्या कोणत्याही व्यक्तीला, वस्तूला, मंदिराला हात लावण्यास सक्त मनाई आहे. जर कळत-नकळत हा गुन्हा घडला तर दंड आकारला जातो. एवढा कठोर नियम असूनही गावाला भेट देणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. पर्यटकांची व्यवस्था गावाबाहेर केली जाते. तिथे आल्यानंतर आपल्याला नोटीस बोर्डवर लिहिलेलं दिसून येतं की गावातल्या माणसांची तुमच्यावर नजर आहे. तुम्ही जर नियमाबाहेर जाऊन काही करण्याचा प्रयत्न केलात तर महागात पडेल.

 

चरसची शेती


स्रोत

स्रोत

चरस सारख्या अंमली पदार्थावर देशभर बंदी असताना या गावात सर्रास चरसची शेती केली  जाते. मलाणा क्रीम नावाची चरस सर्वात महागडी चरस म्हणून विकली जाते. या चरसमध्ये असलेल्या तेलामुळे याला सर्वात जास्त मागणी आहे. पोलीस आणि प्रशासनाच्या वारंवार समजवण्यानंतरही या गावातील चरस शेती कमी झाली नाही. कारण हे या गावाचे  उपजीविकेचे एकमेव साधन आहे.

जगाच्या पाठीवर अनेक बदल होत असताना या गावाने आपली प्राचीनता जपली आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required