computer

झिरोधाच्या अब्जाधीश मालकाने 'चीटिंग' करून विश्वनाथ आनंदला हरवलं? काय आहे संपूर्ण प्रकरण?

जिंकण्यात जो आनंद मिळतो तो इतर कशातही मिळणाऱ्या आनंदापेक्षा अधिक असतो. जिंकण्यासाठी मग लोक कुठल्याही थराला जायला तयार होतात. याला लहान-मोठे, गरीब- श्रीमंत कोणीही अपवाद नाही. पण मात्र सध्या गाजत असलेली एक घटना विचित्र आहे पण मानवी स्वभावाचा गुण दाखवून देणारी पण आहे.

काही दिवसांपूर्वी कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी फंड उभा करावा या हेतूने बुद्धीबळ सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. यात जगतिक चॅम्पियन विश्वनाथन आनंद यांच्यासोबत देशातले काही दिग्गज बुद्धीबळ खेळणार होते. यात अमीर खान, यूझवेंद्र चहल, झीरोधा या कंपनीचे अब्जोधीश मालक निखिल कामत यांचा समावेश होता.

(निखिल कामत)

आता हे सामने कोणीतरी एक विजेता आणि दुसरा पराभूत व्यक्ती ठरावे यासाठी आयोजित केले नव्हते. मुळात ही स्पर्धा नव्हती तर मदतीसाठी आयोजित केलेला एक कार्यक्रम होता. साक्षात बुद्धीबळाचा देव असलेल्या विश्वनाथन आनंदचा पराभव इतर क्षेत्रातील सेलेब्रिटी करतील हे म्हणणे देखील मूर्खपणाचे ठरू शकणार होते. पण असा पराक्रम झाला. निखिल कामत यांनी चक्क आनंद यांचा पराभव केला.

साहजिक यामुळे लोकांचे डोळे वटारले. पण नंतर समोर आलेल्या गोष्टीमुळे कामत यांना मात्र मोठ्या प्रमाणावर टिकेला सामोरे जावे लागले. कोरोना निर्बंधांमुळे हे सामने chess.com वर आयोजित करण्यात आल्याने निखिल कामत यांनी काही टेक्निशियन्सची मदत घेत आनंद यांचा पराभव केला. पण ही गोष्ट काय लपून राहिली नाही.

ही गोष्ट समोर आल्याबरोबर chess.comने कामत यांना ब्लॉक केले आहे. तर चेस फेडरेशन ऑफ इंडियाने या घटनेला दुर्दैवी म्हटले आहे. निखिल कामत यांनी तातडीने स्पष्टीकरण देत, 'आपण आनंद यांचा पराभव करणे म्हणजे झोपेतून उठून पळायला लागलो आणि उसेन बोल्टला हरवून आलो असे म्हणण्यासारखे आहे.'

दुसरीकडे आनंद यांनी मात्र मनाचा मोठेपणा दाखवत यावर संयमी भाष्य केले आहे. 'आपण बोर्डच्या पोजिशननुसार खेळत होतो तसेच इतरांकडून पण तीच अपेक्षा करत होतो.' सोशल मिडियावर तर निखिल कामत यांच्या या वागण्याला तुफान ट्रोल केले जात आहे. आता कामत यांनी माफी मागत सारवासारव केली असली तरी 'जो बुंद से जाती वो हौद से नही आती' याचा अनुभव त्यांना आला असेल.

 

सबस्क्राईब करा

* indicates required