एअर इंडिया काढणार 'तडीपार' ग्राहकांची लिस्ट...!!!

असं काय करता खासदार साहेब? चपलेने मारता काय, दादागिरी काय ?  ऑं ?

आता एखाद्याला नाही समजत खासदार म्हंजी काय असतोय ते. त्यात पन तुम्ही शिवसेनेचे खासदार न्हवं? आता बिझनस क्लासच्या तिकिटावर ईकॉनॉमी क्लास मध्ये बसवल्यावर मानसाला राग तर येनारच ना.

मी म्हनतो अश्या अक्कलशून्य माणसाला धडा शिकवायलाच हवा. नाय नाय.. धडा नाय, चांगला हानायलाच हवा. पन खासदार साहेब, जे काय करायचं ते जरा जागा बघून करावं की!!  आपण जमिनीवर नाय हवेत हाओत हे तरी बघावं कि नाय माणसानं ? जाऊदे.. खासदार म्हटलं कि एखादा अधिकार जास्त येतोच म्हणा... पन यावर तोडगा म्हणून फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाईन्सने साहेबांना इमानाची दारं बंद करून टाकलं हे फार वाईट झालं बघा.

तर मंडळी, आपले माननीय खासदार ‘रवींद्र गायकवाड’ साहेबांनी एयर इंडियाच्या कर्मचाऱ्याला २५ वेळा चपलेने हाणल्यानंतर (मारता मारता चप्पल मोजण्याची कला अवगत हाय आपल्या साहेबांना) एयर इंडियाने ‘नो फ्लाय लिस्ट’ काढायचं ठरवलं हाय.  ज्याला शुद्ध मऱ्हाठीत ‘तडीपार ग्राहकांची यादी’ म्हनत्यात. विमानात राडा करणाऱ्या सभ्य मानसांना या यादीत शामिल केलं जाईल. जेनेकरून पुढच्यावेळी अश्यांना डायरेक्ट एन्ट्रीच बंद !!! अर्थात या लिस्ट मंधी साहेब असणार यात सव्वालच नाय.

तशी गड्यानो ही लय जुनी परंपरा हाय म्हना. आपले माजी उपमुख्यमंत्री ‘रामराव आदिक’ यांना रेड वाईन जरा जास्त झाली अन घसरले की साहेब हवाई सुंदरीवर. काही लोक तर त्यांना ‘रम राव अॅडिक्ट’ म्हणून हाक मारायचे म्हने. आता नंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला ती येगळी गोष्ट म्हना. 

तर आज असोच.

सबस्क्राईब करा

* indicates required