ओबामांचा हा ट्विट ठरलाय दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात पॉप्युलर ट्विट !!

ट्विटरवर अनेकजण प्रसिद्ध आहेत जसे की आपले डोनाल्ड तात्या, पण तात्यांपेक्षा जास्त प्रसिद्ध ठरलेत बराक भाऊ ओबामा !! राव, २०१७ चा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात प्रसिद्ध ट्विट ठरलाय बराक ओबामांनी केलेला ट्विट. राव ? हा कोणता ट्विट आहे जो इतका गाजला....खाली बघा...

बघितला ?

“कोणताही माणूस दुसऱ्याच्या रंगामुळे, किंवा धर्मामुळे त्याच्याशी वैर घेऊन जन्म घेत नाही !”

मंडळी हा ट्विट ओबामांनी १३ ऑगस्ट रोजी रेसिझमच्या विरोधात केला होता. व्हर्जिनिया मधील रेसिझममुळे उडालेल्या हिंसेच्या विरोधात त्यांनी आपले विचार या ट्विट मधून मांडले होते. यानंतर हा ट्विट तब्बल १.७ मिलियन वेळा रिट्विट केला गेला आहे. ट्विटरच्या सर्वेक्षणात आढळून आलं की हा ट्विट यावर्षीचा दुसऱ्या क्रमांकाचा प्रसिद्ध ट्विट होता. याबरोबर ओबामांनी नेल्सन मंडेला यांचा सुद्धा उल्लेख करत ट्विट केला होता जो लोकांना प्रचंड आवडला.

मंडळी या ट्विट बरोबर जोडलेला फोटो खूप काही बोलून जातो. या चित्रात ओबामा एका खिडकी जवळ उभे आहेत आणि खिडकी मध्ये वेगवेगळ्या वंशाची मुले उभी आहेत. रेसिझम सारखा प्रकार या निरागस मुलांच्या गावी सुद्धा दिसत नाहीये. त्वचेच्या रंगामुळे ज्या समाजात हिंसा घडते अश्या समाजाच्या उलट चित्र या फोटोत बघायला मिळतं.

सबस्क्राईब करा

* indicates required