क्रेडिट कार्ड - पेटीएम वॉलेट - २% चार्ज... नेमकं चाललंय काय ? जाणून घ्या सविस्तर

भारतातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय मोबाईल वॉलेट कंपनी असणाऱ्या 'पेटीएम'ने ८ मार्च ला नवा नियम बाहेर काढला. यानुसार जर तुम्ही पेटीएम वॉलेटमध्ये क्रेडिट कार्डवरून पैसे भरत असाल तर त्यावर तुमच्याकडून २% चार्ज आकारण्यात येईल.

यावरून तुमचा मुड अॉफ होणं साहजिकच होतं. कारण विमुद्रीकरणामुळे झालेल्या जखमेवर मलम लावण्यासाठी आणि कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी थोड्याच महिन्यांपूर्वी अॉनलाईन व्यवहारांवर आकारले जाणारे चार्जेस बंद केले गेले होते. पण स्वभावानुसार इथेही या सुविधेचा आपल्या लोकांनी गैरवापर सुरू केल्यामुळे पेटीएमला हा निर्णय घ्यावा लागला होता.

पण पेटीएमचा हा निर्णय लोकांना आवडला नाही. लोक नाराज झाले, दूसरीकडे पेटीएम ची प्रतिस्पर्धी कंपनी मोबीक्वीक ने या व्यवहारांवर कोणताही चार्ज लावलेला नाही. त्यामुळे आज पेटीएमने आपला निर्णय रद्द केला. ग्राहकांना टिकवण्यासाठी पेटीएमला हा निर्णय घेणं भागंच हातं. तेंव्हा आता बिनधास्त पेटीएम करा,कोणताही चार्ज न देता.. 

(स्त्रोत)

 

कसा होतोय पेटीएमचा गैरवापर? 

तर काय होतंय की क्रेडीट कार्डचा वापर केल्यानंतर आपल्याला त्या पैशावर व्याज द्यावे लागते. पण पेटीएमने सर्व व्यवहारावर 0% चार्ज लागू केला असल्याने लोक क्रेडिट कार्डवरून पेटीएम वॉलेटवर पैसे लोड करतात. आणि हेच पैसे वॉलेटवरून आपल्या बँक अकाउंट वर ट्रान्सफर करून वापरले जातात. अर्थातच ०% चार्जेस असल्यामुळे या सगळ्यावर कोणताही अतिरिक्त भार पडत नाही. पण पेटीएमला मात्र या सगळ्या क्रेडिट कार्ड्ससाठी भरपूर शुल्क भरावं लागतं. लोक वॉलेटचा वापर करत नसल्याने पेटीएमला कोणताही नफा मिळत नाहीय. हे लोक पेटीएमचा वापर करून अवैधरीत्या पैसा फिरवत आहेत. म्हणून हा चार्ज आकारला गेला होता. कट झालेले हे २% युजर्सना कूपन्सच्या स्वरूपात मिळणार होते. 

सबस्क्राईब करा

* indicates required