computer

या फोटोग्राफरने लहान मुलांच्या डोळ्यांतली जादू अचूक टिपली आहे...हे १२ नमुने पाहा !!

जगात एक म्हण प्रसिद्ध आहे, 'कानांवर विश्वास ठेवण्यापेक्षा डोळ्यांवर विश्वास ठेवा.' जीभ खोटं बोलू शकते पण डोळे खोटं बोलणं शक्यच नाही. इस्तंबूलचा फोटोग्राफर अब्दुल्ला आयदेमीर तर म्हणतो, "डोळ्यांत संपूर्ण जग सामावलेलं आहे." म्हणूनच तर तो फक्त डोळ्यांचे फोटो काढतो. त्याची निवडही थोडी वेगळी आहे. तो डोळ्यांचे फोटो तर काढतो, पण खास करून लहान मुलांच्या डोळ्यांचे फोटो काढण्यात त्याला अधिक रस आहे. त्याच्या या आगळ्यावेगळ्या निवडीमुळे त्याने आजवर टिपलेले डोळे आपल्याला नवीन काहीतरी सांगू पाहतात.

आज बोभाटा वाचकांसाठी अब्दुला आयदेमीरच्या फोटोग्राफीचे काही निवडक नमुने घेऊन आलं आहे. हे फोटो तुम्हाला थोडावेळ का होईना पण हरवून जायला नक्कीच भाग पाडतील.

सबस्क्राईब करा

* indicates required