ATM पिन क्रमांक चोरीला जाऊ नये म्हणून कॅन्सल बटन दोनवेळा दाबायचं? या व्हायरल मेसेज मागचं सत्य काय आहे??

ATM कार्डचा पिन क्रमांक चोरी होऊ नये म्हणून प्रत्येक वेळी कॅन्सल बटन दोन वेळा दाबण्याचा सल्ला एक व्हायरल मेसेज देत आहे. तुम्हाला असा मेसेज आला का ? आला असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका भाऊ.

स्रोत

व्हायरल झालेला मेसेज अधिकृत आहे हे दाखवण्यासाठी त्यावर अधिकृत संस्थेचा किंवा सरकारचं नाव लिहिलेलं असतं. या व्हायरल मेसेज मध्ये रिझर्व बँकेचं नाव आहे. काही मेसेजेस मध्ये तर लिंक पण शेअर करण्यात आली आहे, पण त्या लिंक वरून आपण रिझर्व बँकेच्या साईट वर जात नाही.

काय आहे या मेसेज मध्ये ?

या मेसेज मध्ये सांगण्यात आलंय की ATM मशीनचा वापर करण्यापूर्वी दोनदा कॅन्सल बटन दाबा. असं केल्याने तुमचा पिन नंबर सुरक्षित राहतो. या मेसेजच्या खरेपणाबद्दल तपासणी केल्यावर हा मेसेज खोटा असल्याचं दिसून आलं आहे. रिझर्व बँकेने असा कोणताही फतवा काढलेला नाही. शिवाय मेसेज मधल्या इंग्रजीच्या चुका हे खोटं असल्याचं उघडपणे सांगत आहेत.

मंडळी, ATM मधून आपले पैसे चोरीला जाऊ नयेत म्हणून असा जुगाड करून उपयोग नाही. किबोर्डवर असलेला कॅन्सल बटन फक्त व्यवहार कॅन्सल करण्यासाठीच वापरता येतो. फसवेगिरीपासून वाचायचं असल्यास आपल्यालाच थोडी दक्षता घेण्याची गरज असते. पिन क्रमांकाबद्दल बोलायचं झालं, तर आमच्या सल्ला असा आहे की, पिन क्रमांक लिहिताना नेहमी एका हाताने किबोर्ड झाका. पिन क्रमांक चोरी करायचाच झाला तर चोरटे किबोर्डच्या वरच्या बाजूला कॅमेरा लावतात.

स्रोत

ATM च्या फसवेगिरीपासून वाचण्यासाठी आमचा हा लेख नक्की वाचा :

ATM वर डल्ला : ATM 'स्कीमिंग' म्हणजे काय ? ते कसे ओळखाल ? त्यापासून सावध राहण्यासाठी काय कराल ?

 

आणखी वाचा :

एटीएम, इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड वापरता? मग या चार गोष्टी तुम्ही कधीच करू नका...

जाणून घ्या नक्की कसं चालतं ATM !!

ATM मधून फाटकी नोट आली तर काय कराल ?...बघा बरं पटपट !!

ATM वर डल्ला मारण्याची चोराची जगावेगळी पद्धत...पाहा बरं काय केलंय त्याने !!

सबस्क्राईब करा

* indicates required