काय आहे केरळमधल्या किस ऑफ लव्हचा किस्सा? जाणून घ्या !

शिवसेनेने केरळातल्या मरिन ड्राइव्हवर प्रेमीयुगुलांना शिवीगाळ आणि मारहाण करण्याचे प्रकार केल्यानंतर फेसबुकवरच्या एका गटानं प्रत्युत्तर देत ‘किस ऑफ लव्ह’ या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या गटानं मरिन ड्राइव्हवर खुलेआम किस करत आपला विरोध दर्शवला. या कार्यक्रमाला पाठींबा देण्यासाठी अर्थातच अनेकांनी सर्वांसमोर चुंबन घेतले.

बुधवारी 'स्टॉप लव्ह अंडर अम्ब्रेला' लिहिलेले फलक घेऊन केरळच्या शिवसैनिकांनी केरळमधल्या मरीन ड्राइव्हवर बसलेल्या तरुण-तरुणींना टार्गेट केलं होतं. याप्रकरणी  एका पोलीस उपनिरीक्षकासह आठ पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली आहे.

विरोधाच्या आगळ्यावेगळ्या पद्धती या आधीही आजमावल्या गेल्या आहेत त्याचंच हे  एक नवीन उदाहरण.

सबस्क्राईब करा

* indicates required