“PUBG मोबाईल चॅम्पियनशीप” स्पर्धा आली आहे भाऊ....भाग घेण्यासाठी माहिती वाचून घ्या !!

सोशल मिडिया वापरणाऱ्यांना PUBG (PlayerUnkown’s Battlegrounds) गेम माहित नसेल असं होणारच नाही राव. तुम्ही जरी PUBG खेळत नसला तरी मिम्सच्या माध्यमातून हा गेम साधारण काय आहे हे तुम्हाला समजलं असेलच. मागील काही महिन्यात भारतात या गेमचे हजारो फॅन्स तयार झालेत. हे लक्षात घेऊन PUBG चक्क PUBG खेळाची स्पर्धा घेऊन आलं आहे.

मंडळी, तुम्ही बरोबर ऐकलंत. PUBG तर्फे एक भव्य स्पर्धा भरवण्यात येणार आहे. या स्पर्धेचं बक्षीस असेल तब्बल ५० लाख रुपये. PUBG फॅन्सच्या मनात नक्कीच उकळ्या फुटल्या असतील. पण थोडं थांबा भाऊ, पूर्ण माहिती वाचून घ्या.

(या गेमिंग स्पर्धेत आपल्या रिस्कवर भाग घ्या.)

स्रोत

तर, PUBG च्या माध्यमातून आर्मी मध्ये गेलेल्या तमाम तरुण जनतेसाठी, विशेष करून कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी PUBG घेऊन आलं आहे भव्य “PUBG मोबाईल चॅम्पियनशीप” स्पर्धा !! भारतातल्या ३० शहरातील तब्बल १००० कॉलेजेस मधले विद्यार्थी यात भाग घेऊ शकतील. स्पर्धेच्या सुरुवातीला एकूण २० टीम्स तयार करण्यात येणार आहेत. प्रत्येक टीम मध्ये एकाच कॉलेजच्या चारजणांचा समावेश असेल. बाकी खेळ कसा खेळायचा हे PUBG वाल्यांना सांगायला नको.

स्रोत

या चॅम्पियनशीप मध्ये नॉकआउट फेरी सुद्धा असणार आहे. इतरांना हा खेळ पाहता यावा म्हणून खेळाचं सोशल मिडीयावर लाइव्ह टेलिकास्ट पण केलं जाईल. म्हणजे यात प्रेक्षक सुद्धा असतील राव.

चॅम्पियनशीप मध्ये भाग घेण्यासाठी ७ ते २३ सप्टेंबर दरम्यान अर्ज करता येईल. अर्ज करण्यासाठी तुम्हाला PUBG च्या या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागेल.

राव, आजवर PUBG खेळून (चिकन डिनर शिवाय) काहीही मिळालं नाही पण आता जिंकलात तर तब्बल ५० लाख मिळणार आहेत. मग वाट कसली बघताय. व्हा तयार, दाखवून द्या आपल्यातली गेमिंगची कला. 

स्रोत

जाताजाता PUBG बद्दल थोडक्यात जाणून घेऊया.

PUBG हा एक ऑनलाईन गेम असून अॅन्ड्रॉइड सह अॅपल मोबाईल्स मध्ये खेळता येऊ शकतो. हा एक ऑनलाईन गेम असल्याने इंटरनेट असणं गरजेचं आहे. या गेम मध्ये तुम्हाला एका आयलंडवर उतरवलं जातं. या आयलंडवर उतरवण्यआधी तुम्हाला काहीही दिलं जातं नाही. एकदा का आयलंडवर उतरवलं की तिथल्या घरांमध्ये जाऊन तुम्हाला वेपन्स, कपडे, खाणं वगैरे घ्यावे लागतात. १०० प्लेयर्स पैकी जो शेवट पर्यंत टिकून राहतो तो जिंकतो. जिंकणाऱ्याचं स्वागत ‘विनर, विनर, चिकन डिनर’ च्या घोषणेत होतं.

दक्षिण कोरियाच्या ब्ल्यूहोल कंपनीच्या PUBG कॉर्पोरेशन या कंपनीने PUBG गेम तयार केला आहे. २०१८ च्या सुरुवातील या गेम्सचे अॅन्ड्रॉइड आणि अॅपल च्या ios व्हर्जन्स रिलीज करण्यात आले. मुळात फ्री असल्याने PUBG खेळ तरुणांमध्ये प्रसिद्ध झाला आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required