computer

लॉकडाऊनमधली कलाकारी.. चक्क इकोफ्रेंडली सायकल!! कुणी, कुठे आणि कशापासून तयार केलीय ती?

कोरोनामुळे अनेक लोकांच्या हातातली कामे गेली आहेत. या सर्व परिस्थितीचा सामना कसा करावा हा त्यांच्यापुढील प्रश्न आहे!! पण काही लोकांना मात्र अशा अडचणीतसुद्धा संधी दिसत असते.

पंजाब मधील जिरकापुर येथील ४० वर्षांचे धनीराम सग्गु नावाचे गृहस्थ सुतारकाम करतात. चंदिगढ पासून काही अंतरावर असलेले हे गाव आहे. लॉकडाऊन झाल्याझाल्या त्यांच्या हातातून काम गेलं. पण निराश न होता काहीतरी वेगळे करण्याचा त्यांनी निश्चय केला. मग काय? धनीराम कामाला लागले आणि भारताच्या आत्मनिर्भर होण्याच्या स्वप्नात हातभार लावू शकेल, असे काम त्यांनी करून दाखवले आहे.

धनीराम यांनी लाकडापासून इको फ्रेंडली म्हणजेच पर्यावरणस्नेही सायकल बनविली आहे. या सायकलीसाठी फक्त देशातून नाहीतर परदेशातूनसुद्धा मागणी येत आहे. यात कॅनडापासून थेट दक्षिण आफ्रिकेसारख्या देशांचा समावेश आहे.

लॉकडाऊन धनीरामांचे दरवाजा खिडक्या वगैरे बनविण्याचे दुकान होती. लॉकडाऊनमुळे ते बंद पडले. त्यांचे पहिले ग्राहक हे राकेश सिंग या नावाचे सरकारी अधिकारी होते. नुरा इंटेरियर्स या नावाखाली 15 हजाराला ते सायकल विकत आहेत. दिवसाला 25 किलोमीटर एवढा प्रवास करण्याची या सायकलची क्षमता आहे. मागच्या एका महिन्यात त्यांनी अशा ८ लाकडी सायकल बनवून विकल्या आहेत. अनेक सायकल कंपन्यांकडून त्यांना ऑफर येत आहेत. हिरो कंपनीनेदेखील त्यांना शुभेच्छा पाठवल्या आहेत.

लॉकडाऊन चांगला नाहीच, पण त्यामुळे काही लोकांच्या अंगातले सुप्त गुण बाहेर पडले आहेत हे ही तितकंच खरं!!

सबस्क्राईब करा

* indicates required