computer

रोबोट व्हॅक्यूम क्लीनर्स!! सध्या उपलब्ध मॉडेल्स, वैशिष्ट्ये आणि मुख्य म्हणजे किंमती साधारण काय आहेत?

लॉकडाऊनमध्ये कामवाली नसल्याने अनेक घरात सगळेजण काम करून थकले होते. भांडी आणि लादी पुसताना अनेकांना वाटले होते की यासाठीही मशीन असते तर काम किती सोपे झाले असते. त्याकाळात आणि नंतर डिशवॉशरची मागणी प्रचंड वाढली. फरशी झाडायला यंत्र म्हणून लोक व्हॅक्यूम करण्यासाठी मशीन शोधू लागले. बाजारात व्हॅक्यूम क्लीनर्स आहेतच, पण आता स्वयंचलित रोबोट व्हॅक्यूम क्लीनर्सची चलती आहे. हे आकाराने लहान व सर्वात सोपे स्मार्ट उपकरण आहे. आज पाहूयात ते काम कसे करतात आणि बाजारात कोणते सर्वोत्तम रोबोट व्हॅक्यूम क्लीनर्स उपलब्ध आहेत.

गेल्या काही वर्षांमध्ये रोबोट व्हॅक्यूम क्लीनरची लोकप्रियता वाढली आहे. युरोपियन देशात ते लोकप्रिय होऊ लागले आहेत तसेच भारतातही त्यांची विक्री वाढत आहे. आपले घर आपोआप साफ करणारे हे क्लीनर्स आकाराने गोलाकार असतात. त्यामध्ये लेझर, कॅमेरा आणि इतर सेन्सर्स असतात. त्यामुळे त्यांना कुठे अडथळे आहेत, कुठे धूळ आहे हे नीट समजते. बरं, त्यांचा आकारही असा असतो की ते फर्निचरच्या खाली जाऊनही ते स्वच्छता करु शकतात. ते धूळ किंवा कचरा शोषून घेतात आणि जवळच्या कचराटाकीत साठवतात. ती टाकी नंतर साफ करता येते. हे क्लीनिंग रोबॉट्स् चार्जिंगवर चालतात. याला रिचार्जेबल बॅटरी असते, एकदा चार्ज केल्यावर ते पूर्ण घर साफ करतात. एकदा चार्ज केल्यावर बॅटरी जवळजवळ तीन तास चालते. बरेचसे मॉडेल्स बॅटरी संपल्यावर स्वतःच डॉकिंग स्टेशनवर जाऊन चार्ज होतात. अर्थात यात अनेक प्रकार येतात. प्रत्येक रोबोट व्हॅक्यूम क्लीनरचे वैशिष्ट्य आणि किंमत वेगवेगळी असते. चार्जिंगसाठी ५ ते ७ तास वेळ लागतो.

हे व्हॅक्यूम क्लीनर वर्तुळाकार असतात त्यामुळे खोलीच्या कडेने कोणतीही धूळ आणि कचरा देखील गोळा केला जातो. त्यासाठी व्हॅक्यूम क्लीनरच्या खाली अनेक लहान ब्रशेस असतात. इन्फ्रारेड लेझर्स असलेले रोबोट व्हॅक्यूम क्लीनर खोलीचा आकार मोजून सफाई करतात. ते तुलनेने महाग असतात. तर त्यामानाने स्वस्त असलेले रोबोट खोलीची सीमा पाहून साफसफाई करतात. हे कार्पेट, टाईल्स आणि लाकडी पृष्ठभाग चांगल्या प्रकारे साफ करतात. त्याचा आवाजही खूप नसतो. यातले काही क्लीनर्स ॲलेक्सा, siri, google असिस्टंटवर ही चालतात. ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या इ-कॉमर्स साईटवर हे व्हॅक्यूम क्लीनर्स उपलब्ध आहेत.

या श्रेणीत सर्वोत्तम रोबोट व्हॅक्यूम क्लीनर कोणते आहेत?

Mi Robot Vaccum Mop P

25,000 रुपये किंमतीचा हा xiaomi कंपनीचा रोबोट व्हॅक्यूम क्लीनर आहे. याची बॅटरी आहे 3200mAh आणि ती 130 मिनिटांपर्यंत चालते. याला LDS लेझर navigation सिस्टिम आहे. ती अँपद्वारे नियंत्रित करता येते आणि त्याद्वारे राहिलेली धूळ वगैरे साफ करता येते. या क्लीनरला 550 ml डस्ट बॉक्स दिलेला आहे आणि तो गुगल असिस्टंट पोर्टेबल आहे.

Eureka Forbes roho vac N Mop

याची किंमत 19,697 आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे याला Uv sanitization दिले आहे जे स्वच्छता अधिक चांगल्या प्रकारे करते. एकदा चार्ज केल्यावर 90 मिनिटे याची बॅटरी चालते. मार्बल, टाईल्स आणि लाकडी फ्लोरिंग हे चांगल्या प्रकारे साफ करतात असा कंपनीने दावा केला आहे.

iLife A9s

Mi रोबोटपेक्षा याची किंमत थोडी जास्त आहे. 26,900 रुपये इतकी याची किंमत आहे. या बरोबर 450 ml।इतका डस्ट बॉक्स येतो. डस्ट बॉक्स म्हणजे यात धूळ, कचरा जमा जातो. हा रोबोटही ॲपद्वारे नियंत्रित करता येतो. तसेच हा अलेक्सा आणि गुगल होम पोर्टेबल आहे.

IRobot Roomba i 7

हा या लिस्टमधला सगळ्यात महागडा रोबोट क्लीनर आहे. याची किंमत 59,900 रुपये आहे. यामध्ये 13 ghz क्वाड कोर प्रोसेसर आहे. यात अत्याधुनिक नेव्हीगेशन टेक्नोलॉजी आहे. सोबत 500 ml इतका डस्ट बॉक्स येतो, जो भरल्यावर आपोआप धूळ, कचरा टाकून देतो. एकदा बॅटरी चार्ज केल्यावर 120 मिनिटापर्यंत हा चालतो. तसेच ॲप आणि अलेक्साद्वारे हा नियंत्रित करता येतो.

Milagrow iMap 10 Galaxy

Roomba च्या तुलनेत स्वस्त, याची किंमत 40,290रुपये आहे. याला RT2R (real time terrain recognition technology) दिलेली आहे. यालाही क्वाड कोर प्रोसेसर आहे. याची बॅटरी 3200 mAH आहे आणि ती 1000 रिचार्ज सायकल चालते. याला 450ml इतका डस्ट बॉक्स येतो. तसेच ॲप आणि अलेक्साद्वारे हा नियंत्रित करता येतो.

लवकरच Realme कंपनीचा रोबोट व्हॅक्यूम क्लीनर भारतात लाँच होणार आहे. त्याची किंमत 27,000रुपये असेल. दिवाळीच्या आधी तो लाँच करायचा कंपनीचा विचार आहे. सणासुदीच्या दिवसात नवे गॅझेट घ्यायचे असल्यास हा पर्यायही पाहता येईल. माहिती आवडल्यास जरूर शेयर करा.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required