हा समोसा पाहून लोक का तापलेत? तुम्हीच पाहा !!

२०१९ हे वर्ष विचित्र पदार्थांचं वर्ष होतं. उदाहरणार्थ, गुलाबजामुनची भाजी, गुलाबजाम पाव, संत्र्याच्या रसात तयार केलेली मॅगी, कुरकुरे मिल्कशेक, इत्यादी. हे तर लोकांनी उचापती म्हणून तयार केलेले होते, पण मॅक्डॉनल्ड सारख्या मोठ्या ब्रँडने पण ‘डोसा मसाला बर्गर’ आणून लोकांना धक्का दिला होता. एवढंच काय, चंदीगडच्या एका रेस्टॉरंटमध्ये ‘दालमाखनी कॅपिचीनो’ डिश सर्व्ह केली जायची.

तर, २०१९ च्या मानाने २०२० शांत जात होतं. पण नुकताच एकाने या शांततेचा भंग केला आहे. हमझा गुलजार नावाच्या ट्विटर युझरने चक्क ओरिओ आईसक्रिम भरून तयार केलेल्या समोशाचा फोटो पोस्ट केला. असा समोसा तुम्ही नक्कीच बघितला नसणार.

हा फोटो व्हायरल झाल्यानंतर लोकांची सटकली नसती तरच नवल. लोकांनी काय म्हटलं आहे हे तुम्हीच पाहा.

तुम्ही असे विचित्र पदार्थ केलेत का? केले असतील तर फोटो शेअर करा ना भाऊ !!

सबस्क्राईब करा

* indicates required