computer

लॉकडाऊन उद्योग- चौथीतल्या मुलीनं सुरू केलेलं हे हस्तलिखित वर्तमानपत्र पाह्यलंत का??

या चिमुकलीने सुरू केलंय स्वतःचे वर्तमानपत्र!

जेव्हा लॉकडाऊनमध्ये घरातली मोठी माणसं जीव रमवण्यासाठी काय काय उद्योग करून फेसबुकवर पोस्ट टाकून चमकत असतात तेव्हा मुलं मात्र हटके, नवं काहितरी करून आणि चाकोरीबाहेर जाऊन मन रमवत असतात.

चौथीत असलेल्या आरोही जावडेकरने तर चक्क स्वतःचं हस्तलिखित वृत्तपत्र सुरू केलंय. या वृत्तपत्राचं नाव आहे - "ए न्यूज : व्हॉइस ऑफ द जनरेशन अल्फा!!" आणि या वृत्तपत्रात बातम्यांसोबत तिच्या वयाच्या वाचकांना आवडतील अशा जाहिराती पण असतात! 

आज बोभाटाच्या वाचकांसमोर आम्ही गेल्या तीन दिवसांचे पेपर ठेवतोय. आणि हो, बोभाटासाठी तिने खास व्हिडिओ पण बनवलाय! आता मोठ्यांनी लहानांकडून काहीतरी शिकायला हवंय!

सबस्क्राईब करा

* indicates required