१४००० रुपयांचे फ्रेंच फ्राईज? एवढं काय खास आहे या फ्रेंच फ्राईजमध्ये??

तुम्ही कितीही फ्रेंच फ्राईजचे शौकीन असाल, पण तुम्ही आजवर २००-३०० किंमतीपेक्षा महाग फ्रेंच फ्राईज खाल्ले नसतील. पण जर तुम्ही खरंच फ्रेंच फ्राईजचे मोठे चाहते असाल तर तुम्ही किती महागातले फ्राईज खरेदी करू शकता? जर तुम्हाला १४,००० रुपये किंमतीचे फ्राईज विकले जात आहे असे सांगितले तर खरेदी कराल का? काही विशिष्ट पदार्थ टाकून बनवलेलेहे फ्राईज खरोखर इतके महाग विकले जात आहेत.

न्यू यॉर्क येथील सेरेंडीपीटी ३ या रेस्टॉरंटमधील ही किंमत असून जगातील सर्वात महाग फ्रेंच फ्राईज इथे विकले जातात असा त्यांचा दावा आहे. या रेस्टॉरंटने फक्त फ्रेंच फ्राईज नाही, तर जगातला सर्वात महाग बर्गर आणि आईसक्रीम आपण विकतो असा दावा केला आहे. एकाअर्थी हे जगातले सर्वात महाग रेस्टॉरंट ठरते. फ्रेंच फ्राईजच्या बाबतीत तर त्यांनी गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड नोंदवले आहे.

या फ्राईजला त्यांनी फ्रेंच नाव दिले आहे. 'क्रीम डे ला क्रिम पोमे फ्राईज' असे या फ्रायचे नाव आहे. यात चिपरबेक बटाटा व्हिनेगर आणि शांपेनमध्ये ब्लांच करून रेग्युलर तेलाऐवजी शुद्ध गुज (बदकदृश्य प्राणी) फॅटमध्ये फ्राय केले जाते. बटाटा हा डबल फ्राय असतो. २३ कॅरेटच्या गोल्ड डस्टचा शिडकावा यात केलेला असतो. हे सर्व करून झाल्यावर क्रिस्टल प्लेटमध्ये ऑर्किडसहीत सजावट करून ही डिश तुमच्यासमोर येते.

तर हे सर्व वाचून तुम्हाला भारी वाटत असेल तर एकतर यासाठी तुम्हाला न्यूयॉर्क जावे लागेल किंवा मग देशातच असा प्रयोग करावा लागेल. आणि हो, फ्रेंच टोस्ट आणि फ्रेंच फ्राईज हे दोन्ही पदार्थ फ्रेंच नाहीत हे ही तुम्हांला जाताजाता सांगतो.

सबस्क्राईब करा

* indicates required