शिमलाकर पर्यटकांना शिमल्यात येऊ नका म्हणून विनंती का करत आहेत ?

पर्यटकांनी शिमल्यात येऊ नये अशा पोस्ट सोशल मिडीयावरून प्रसारित केल्या जात आहेत. आणि हे करणारे दुसरे तिसरे कोणी नसून शिमल्याचेच नागरिक आहेत. शिमला हे एक थंड हवेचं ठिकाण आहे. उन्हाळ्यात पर्यटकांची तिथे झुंबड उडते. पण सध्याच्या परिस्थितीवरून तरी तुम्ही तिथे न गेलेलंच बरं. चला याचं कारण समजून घेऊया.
पाणी टंचाई ही मोठी समस्या सध्या शिमल्यातल्या नागरिकांना सतावत आहे. जवळजवळ २ लाख माणसांना गेल्या १० दिवसात पुरेसं पाणी मिळालेलं नाही. त्यामुळे शिमल्यात सध्या पाण्यासाठी लांबच्या लांब रांगा दिसत आहेत. पर्यटकांची रेलचेल असलेल्या रस्त्यावर आता भांड्यांची रेलचेल वाढलेली आहे.
मंडळी, पाणी समस्येमुळे शिमल्यातील नागरिक पर्यटकांना शिमल्यात येऊ नका अशी विनंती करत आहेत. यासाठी त्यांनी सोशल मिडीयाचा सहारा घेतलाय. ‘शिमल्याला भेट देणं बंद करा’ अशा आशयाचा मजकूर सध्या फेसबुक आणि इतर सोशल साईट्सवर फिरतोय.
इथल्या नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. जर पर्यटकांची संख्या वाढली तर ही परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. १.७२ लोकसंख्येच्या शिमला मध्ये दरवर्षी लाखभर पर्यटकांची भर पडते. एवढ्या जनसंख्येची तहान भागवायला दर दिवशी ४.५ कोटी पाण्याची गरज लागते.
मंडळी, शिमल्यातील महत्वाच्या कार्यक्रमांपासून ते इमारत बांधकाम आणि कार वॉशिंग सेंटरवरही बंदी घालण्यात आलेली आहे.
शेवटी काय तर यावर्षी शिमला जाणं टाळाच !!
आणखी वाचा :
पाण्याच्या निर्यातीत भारत अग्रेसर !!
वयाच्या ७० व्या वर्षी तब्बल ३३ फुट विहीर खोदणारे कोण आहेत हे आजोबा ?