जेव्हा थेट अंबानींकडेच जिओ चालत नाही म्हणून तक्रार होते.. जाणून घ्या पुढे काय झाले..

दीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीला अर्धा बॉलीवूड आणि काही बड्या उद्योगपतींनी हजेरी लावली होती. अंबानी कुटुंबही आलं होतं. मिडीयाने यावेळी मुकेश अंबानींना एक सरप्राईज दिला. एका फोटोग्राफरने ओरडून म्हटलं 'सर, जिओ नहीं चल रहा’. आता बोला !!

स्रोत

राव, हे तर खरं आहे की जिओ तद्दन दगाबाज आहे. कधी ऐनवेळी इंटरनेट बंद पडतं, तर कधी नेटवर्क मिळत नाही. वैतागलेल्या फोटोग्राफरने आपली तक्रार मांडण्यासाठी चांगली वेळ शोधून काढली, पण.... त्याची तक्रार ऐकून मुकेश अंबानी यांचा चेहरा गोरामोरा झाला. यावर त्यांनी फक्त हसून वेळ मारून नेली. हे सुरु असताना संजय दत्तची एन्ट्री झाल्याने ते लवकरच या पेचातून सुटले असं म्हणायला हरकत नाही.

समस्त इंटरनेटवर दिवसरात्र पडीक संघटनेची एवढीच मागणी आहे, की फोटोग्राफर बांधवाने केलेल्या तक्रारीची दखल घेतली जावी आणि जिओ मध्ये सुधारणा व्हावी. तेवढाच पोरांचा आशीर्वाद मिळेल!!

तर मंडळी, हे सगळं कॅमेऱ्यात कैद झालं आहे, ते एकदा तुम्ही बघाच. मुकेश अंबानी यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघण्यासारखे झाले होते.

सबस्क्राईब करा

* indicates required