एअरलाईनला या पाच वर्षांच्या मुलीची माफी मागायला लागली आहे भाऊ...काय प्रकरण आहे हे?

साउथवेस्ट एअरलाइन्सने चक्क एका ५ वर्षाच्या मुलीची माफी मागितली आहे. त्यांनी गुन्हाच असा केला आहे की त्याला माफी नाही. त्यांनी या लहानग्या मुलीच्या नावाची चेष्टा मस्करी केली होती. एवढंच नाही तर तिच्या नावावरून तिला सोशल मिडीयावर ट्रोल देखील केलं होतं. काय आहे तिचं नाव ? चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

स्रोत

झालं असं की, ही लहानगी तिच्या आई सोबत विमान प्रवास करत होती. गेटवरच तिच्या बोर्डिंग पासला बघून गेट एजंट हसू लागला. त्यांनतर त्याने मुलीकडे बोट दाखवून इतर स्टाफना तिचं नाव दाखवलं आणि तेही हसू लागले. हे बघून मुलीच्या आईने त्यांना दम भरला. पण हे प्रकरण इथेच थांबलं नाही. त्यापैकी एकाने तिच्या बोर्डिंग पासचा फोटो सोशल मिडीयावर अपलोड केला.

या मुलीच्या नावात काय आहे एवढं हसण्यासारखं ? तिचं नाव आहे ‘ABCDE’.

स्रोत

मंडळी, कॅलिफोर्निया ते टेक्सास फ्लाईट दरम्यान हा प्रकार घडला. तिचा बोर्डिंग पास सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर एअरलाइन्स स्टाफचा खोडसाळपणा उघड झाला आहे. याबद्दल तिच्या आईने काय म्हटलं ते आपण पाहूया :

तिचं नाव ‘ABCDE’ का आहे हा प्रश्न पडला असेल तर त्याचं असं की नाव जरी ‘ABCDE’ असं दिसत असलं, तरी त्याचा उच्चार ab-si-dee (अॅबसायडी) असा होतो. या नावाच्या अनेक मुली अमेरिकेत आहेत. दरवेळी या नावाची टर उडवली जात असल्याने मध्यंतरी ‘ABCDE’ हा चर्चेचा मुद्दा बनला होता.

मंडळी, साउथवेस्ट एअरलाइन्सने मुलीची याबद्दल माफी मागितली आहे व तो फोटो सोशल मिडीयावरून काढून टाकला आहे, पण त्या कर्मचाऱ्यावर अजूनही कोणतीच कारवाई झालेली नाही.

याबद्दल तुम्हाला काय वाटतं ? सांगा बरं!!

सबस्क्राईब करा

* indicates required