जोयिता मंडल : भिकारी ते न्यायाधीशापर्यंतचा प्रवास !!

देशाच्या पहिल्या तृतीयपंथी पोलीस उपनिरीक्षकाची कहाणी आम्ही तुम्हाला इथे सांगितली होती. आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीची कहाणी सांगणार आहोत जी तृतीयपंथी तर आहे,  पण तिचा प्रवास कैकपटीने खडतर होता. तिने संघर्षातून आज यशाची पायरी गाठली आहे.

ही कहाणी आहे प. बंगाल‌म‌ध‌ली. तिथ‌ल्या उत्तर दिनाजपुर जिल्ह्यात‌ल्या ‘जोईता मंडल’ या तृतीयपंथी न्यायाधिशाची. ज्योईताचा प्रवास भिकारी ते थेट न्यायाधीश असा होता. तिने एकाकाळी ज्या भागात भीक मागितली होती त्याच भागातल्या कोर्टात आज ती ‘जजशिप ऑन ड्यूटी’ अशी लाल अक्षरात लिहिलेली पाटी झळकणाऱ्या कारमधून उतरते. 

२०१० साली ज्योईताला तिच्या तृतीयपंथी असल्याकारणावरून हॉटेलची रूम नाकारली होती.  त्यानंतर तिच्यावर रस्त्यावर झोपण्याची वेळ आली. एक असा काळ होता की तिने भीक सुद्धा मागितली. नशिबाचा खेळ पाहा. ती ज्या रस्त्यावर झोपली त्या रस्त्यापासून तिचं कार्यालय अवघ्या १० मिनिटाच्या अंतरावर आहे. आपल्या खडतर आयष्यात तिने इतर तृतीयपंथी सहकाऱ्यांच्या वाट्याला असं जीवन येऊ नये म्हणून २०११ पासून सामाजिक कार्यदेखील केलं. यादरम्यान तिने आपलं शिक्षण मात्र सुरु ठेवलं. आणि आज ती या पदाला पोहोचली आहे.

Joyita Mondalस्रोत

इस्लामपूरच्या सब-डिविजनल लीगल सर्विस कमिटीने घेतलेल्या निर्णयाने तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. 8 जुलै, हाच तो दिवस. ज्योईताची नियुक्ती लोकअदालत न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून झाली. त्यानंतर तिच्या फेसबुक अकाउंट वर शुभेच्छांचा पाऊस पडू लागला. जोईता सोशल वर्कर म्हणून जॉईन झाली असून सध्या ‘लर्न्ड जज’ कॅटेगिरीत आहे. 

ज्योईता म्हणते त्याप्रमाणे तिचं हे यश लिंगभेद करणाऱ्यांसाठी मोठी चपराक आहे.

 

देशाच्या पहिल्या तृतीयपंथी पोलीस उपनिरीक्षकाची कहाणी !!!

सबस्क्राईब करा

* indicates required