आपला मित्र एलियन असल्याच्या संशयावरून या तरुणाने काय केलं बघा !!

मंडळी स्वित्झर्लंडमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीनं आपल्या मित्राचा खून केला. आता खून करण्याचं कारण काय, तर म्हणे माझा मित्र चक्क एलियन आहे आणि तो एलियन माझा जीव घेणार आहे असा मला भास झाला होता. तसं तर आपला मित्र आपल्याला एलियन, माकड, चिम्पान्झी, कुत्रा असा काहीही वाटू शकतो.  पण म्हणून काय त्याचा खून करावा? असो...

तर झालं असं की,  अॅलेक्स मॉर्गन नावाचा एक तरुण आपल्या मित्राच्या घरी गेला. रात्रभर त्यांनी चांगलं एकत्र खाल्लं-प्यायलं आणि सकाळ होईपर्यंत त्यांच्यात भांडण झालं. यावेळी खून करणारा ‘वॉन वेर्टीस’ हा तरुण नशेच्या अंमलाखाली होता आणि त्याने कोकेन घेतलं होतं.

कोर्टात उभं केल्यावर या वॉन वेर्टीसनं असा अजब खुलासा केला की आपला मित्र हा एलियन होता आणि तो मला जीवे मारणार होता. त्याच्या या बडबडण्यावरुन तर असंच दिसतं की त्यानं नशेच्या धुंदीत हा खून केला. इतकंच नाही तर याआधी त्याच्यावर बलात्काराचा सुद्धा आरोप आहे.

अंमली पदार्थाच्या सेवनाने किती विचित्र प्रकार घडू शकतो त्याचं हे ताजं उदाहरण!!

सबस्क्राईब करा

* indicates required