पुणेकरांनी शोधले ११ सूर्याहूनही तप्त दुर्मिळ तारे!!

सूर्यापेक्षा गरम कोण आहे या प्रश्नाचे उत्तर आजवर सापडलेले नाही. पुणेकरांनी मात्र हे कोडे पण सोडवून दाखवले आहे. पुण्यात काही उणे नाही हे म्हणणे या निमित्ताने सिद्ध झाले आहे. आता तुम्ही म्हणाल असे काय आणि कोणी शोधून काढले? पुढे वाचा म्हणजे तुम्हाला कळेल.

पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर रेडिओफिजिक्स येथील काही संशोधकांनी काही दुर्मिळ तारे शोधून काढले आहेत. हे तारे सूर्याहूनही तप्त आहेत. समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार हे तारे मेन सिक्वेन्स रेडिओ पल्स इमिटर्स ऑफ एमआरपी या कॅटेगरीतले आहेत. त्यांना संक्षिप्त रुपात एमआरपी असे म्हटले जाते.

संशोधकांनी एका मोठ्या मीटरवेव्ह रेडिओ पल्सचा वापर करून हे शोधून काढले आहे. आजवर फक्त जगभरात १५ एमआरपी शोधण्यात यश मिळाले आहे. त्यातले ११ एकट्या पुण्यातील संशोधकांनी शोधले आहेत. त्या ११ पैकीही ८ याच वर्षी शोधण्यात आले आहेत.

हे मेन सिक्वेन्स रेडिओ पल्स इमिटर्स सूर्याहूनही तप्त असतात. ते मॅग्नेटिक फिल्ड्समधून मोठ्या प्रमाणावर मॅग्नेट्युड सोडतात. तसेच ते स्टेलर वाइन्ड्सपेक्षा अधिक सक्षम असतात. याच कारणांमुळे हे तारे जेव्हा ब्राईट रेडिओ पल्सेस सोडतात तेव्हा ते डार्क आयलँडमध्ये दीपस्तंभासारखे भासत असतात.

या शोधामुळे एमआरपी हे दुर्मिळ अशा दिव्य वस्तू असतात या समजाला धक्का बसणार आहे. उलट ते अधिकच कॉमन असतात हेच या शोधामुळे समोर येत आहे. पहिला एमआरपी हे २००१ साली शोधण्यात आला होता आणि त्यानंतर विसाव्या वर्षी एकदम ८ एमआरपी शोधण्यात आले आहेत.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required