मध्यप्रदेश मध्ये एका वर्षात तब्बल १४ वाघांचे बळी ? काय कारण आहे ??

मंडळी, अवनी वाघिणीच्या मृत्यूने मोठं वादळ उठलं होतं. आज आम्ही जी बातमी सांगणार आहोत त्याने तितकं वादळ उठणार नाही, पण प्रश्न अवनी इतकाच मोठा आहे. मध्यप्रदेशच्या सतना जिल्ह्यात एका वाघाला विजेच्या तारेने मारण्यात आलं आहे. या वाघाच्या मृत्यूने मध्यप्रदेश मधल्या वाघांच्या मृत्यूची संख्या १४ वर पोहोचली आहे. ही संख्या एका वर्षातली आहे भाऊ.

स्रोत

माझगाव येथील जंगली भागात वाघाचा मृतदेह आढळला आहे. ज्या विजेच्या तारेला अडकून हा वाघ मेला ती तार मुद्दाम वाघाच्या शिकारीसाठी तिथे लावण्यात आली होती. वाघाची शिकार म्हटलं की आपल्याला वाघाचे कातडे, नखं यांची तस्करी नजरेसमोर येते. या वाघाच्या बाबतीत गोष्ट वेगळी आहे. 

माझगाव भागातील जंगल हे मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर आहे. या भागात गेल्या दोन आठवड्यात २ वाघ आणि एक बिबट्याची शिकार करण्यात आली होती. या शिकारीचं कारण होतं बुवाबाजीद्वारे पैशांचा पाऊस पाडणे.

स्रोत

माझगाव वन्य भाग हा वाघांचं एक महत्वाचं आश्रयस्थान आहे. पण काही दिवसांपासून ही जागा धोकादायक झाली आहे. बंदुकीच्या गोळीने आवाज होतो म्हणून विजेच्या तारेचा वापर केला जातोय. या भागात अशा प्रकारे वाघाला मारून खाणे आणि त्याच्या नखांचा, केसांचा वापर बुवाबाजीसाठी करणे ही गौरवाची गोष्ट समजली जाते.

आम्ही ज्या वाघाबद्दल सांगत आहोत त्याची नखे, कातडे शाबूत होती. म्हणजे शिकारी येण्यापुर्वीच या वाघाचा पत्ता लागला. 

मंडळी, १४ वाघ हे एका वर्षात मृत्युमुखी पडले आहेत. जर हे असंच सुरु राहिलं वाघ इतिहास जमा व्हायला वेळ लागणार नाही.

 

आणखी वाचा :

वाघांच्या शिकारीसाठी सरकारने स्वतः दिलं होतं आमंत्रण ? वाचा काय आहे सत्य !!

हे आहेत भारतातले सेलिब्रिटी वाघ. यातले तुम्ही किती पाहिलेत?

सबस्क्राईब करा

* indicates required