computer

ट्रॅफिकला कंटाळून त्याने स्वतःचं विमान बनवलं भाऊ !!

ट्रॅफिकचा प्रत्येकाला तिटकारा असतो. मागे ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर एक जन गाडीच्या बाहेर येऊन नाचत असतानाचा विडिओ वायरल झाला होता. टाईमपास करण्यासाठी लोक काहीतरी उपाय शोधून काढत असतात. पण एका गड्याने ट्रॅफिकवर उपाय म्हणून थेट हेलिकॉप्टर बनवून दाखवले आहे मंडळी!!

इंडोनेशिया मधील जुजून जुनेदी याने हेलिकॉप्टर बनवले आहे. जकार्तापासून जवळ असलेल्या त्याच्या शहरात ट्रॅफिकची मोठी समस्या निर्माण झाली होती. ट्रॅफिकमध्ये जाणारा वेळ त्याला सतावत होता. म्हणून मग त्याने हेलिकॉप्टर बनवण्याचे ठरवले. यु ट्यूबवर विडिओ पाहून हळूहळू तो शिकायला लागला.

42 वर्षीय जुनेद सांगतो की या कामासाठी त्याला 15 लाख रुपये लागले. विशेष म्हणजे त्याच्या मुलाची या कामात त्याला मोठी मदत झाली. पेट्रोलच्या साहाय्याने हे हेलिकॉप्टर उडू शकणार आहे. जवळपास 18 महिने मेहनत केल्यावर त्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

मंडळी, अजून त्याच्या हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले नसले तरी ते यशस्वी होईल असा विश्वास जुनेदला आहे. मागे पाकिस्तानात पण एकाने हेलिकॉप्टर तयार केले होते. पण त्याच्या उड्डाणाची परवानगी त्याला मिळाली नव्हती.

 

लेखक : वैभव पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required