computer

२०१८ मध्ये झाली या लोकांची हवा....पाहा बरं कोणकोण आहेत सर्वाधिक चर्चेत !!

२०१८ च्या समाप्तीनिमित्त ‘याहू इंडिया’ने एक सर्वेक्षण केलं आहे. सर्वेक्षणातून या वर्षी सर्वाधिक चर्चेत असलेल्या व्यक्तींची माहिती मिळाली आहे. याखेरीज सर्वाधिक सर्च झालेल्या व्यक्तींची नावंही समजली आहेत.

मागच्या काही वर्षापासून नरेंद्र मोदी हे बातम्यांमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिले आहेत. याहूच्या टॉप न्यूजमेकरच्या यादीत नरेंद्र मोदींनी पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यानंतरचा क्रमांक आहे राहुल गांधींचा. सर्वाधिक सर्च केलेल्या व्यक्तींमध्ये दरवर्षीप्रमाणे सनी लिओनी पहिल्या क्रमांकावर आहे तर तिच्या खालोखाल श्रीदेवी आहेत. या यादीत एका पाकिस्तानी व्यक्तीचाही समावेश आहे. १० व्या क्रमांकावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आहेत. भारतात त्यांना सर्वाधिक सर्च केलं गेलं होतं.

मंडळी, चला तर आता इतर कोणकोणत्या व्यक्तींनी २०१८ मध्ये हवा केली ते पाहूया.

 

सर्वाधिक सर्च झालेल्या व्यक्ती

१. सनी लिओनी

२. श्रीदेवी

३. नरेंद्र मोदी

५. प्रिया प्रकाश वॉरियर

६. राहुल गांधी

७. प्रियांका चोप्रा

१०. इम्रान खान

टॉप न्यूजमेकर

 

१. नरेंद्र मोदी

२. राहुल गांधी

३. दीपक मिश्रा (माजी सरन्यायाधीश)

४. विजय मल्ल्या

५. नीरव मोदी

स्रोत

६. एमजे अकबर

७. महेंद्रसिंग धोनी

८. दीपिका पदुकोण-रणवीर सिंग

९. प्रिया प्रकाश वॉरियर

१०. तैमुर अली खान