करुणानिधी फक्त काळाच चष्मा का वापरायचे ??

पाच वेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्री झालेल्या करुणानिधी यांचे परवा निधन झाले. काळा चष्मा, पिवळी शाल, पांढरा शर्ट आणि लुंगी ही करुणानिधी यांची ओळख होती. त्यांच्या काळा चष्मा वापरण्यामागची कहाणी पण एकदम रंजक आहे.
करुणानिधी यांना वाचनाची आणि लिखाणाची खूप आवड होती. ते सतत वाचत असायचे. त्यातूनच १९५४ मध्ये त्यांच्या डाव्या डोळ्याने त्रास द्यायला सुरुवात केली. डॉक्टरांनी त्यांना वाचन कमी करण्यास सांगितले. पण त्यांनी डॉक्टरांचे ऐकले नाही आणि डोळ्यात औषध टाकत त्यांनी वाचन चालूच ठेवले. १९६७ मध्ये त्यांना एक अपघात झाला. असे पण सांगितले जाते की हिंदी भाषाविरोधी आंदोलनात एकदा पोलिसांची लाठी डोक्यात बसली. या सगळ्या गोष्टींमुळे त्यांचे डाव्या डोळ्याचे दुखणे वाढले. हे दुखणे इतके वाढले की करुणानिधींनी १९६७ मध्ये अमेरिकेत जाऊन डोळ्यावर शस्त्रक्रिया करून घेतली. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना काळा चष्मा वापरण्यास सांगितले. त्यांनी काळया रंगाचा आणि जाड फ्रेमचा चष्मा वापरण्यास सुरुवात केली आणि हाच चष्मा त्यांची ओळख बनली.
करुणानिधी यांनी तब्बल ५०वर्षे एकच चष्मा वापरला. २०१७ मध्ये डॉक्टरांनी त्यांना चष्मा बदलण्यास सांगितले. त्यांना मनासारखा चष्मा मिळत नव्हता. एकूण ४० दिवसाच्या शोधानंतर त्यांना हवा तसा वजनाने हलका आणि आरामदायी चष्मा मिळाला. तर अशी आहे करुणानिधी यांच्या चष्म्याची कहाणी...