computer

अतिशहाण्या अमेरिकेच्या कृषि विभागाने नवीन घोळ काय घातलाय पाह्यला का?

चुका या सगळ्यांकडूनच होतात, पण अमेरिकेसारख्या देशाच्या कृषी विभागाकडून एवढी मोठी चूक होईल याचा कोणीही विचार केला नव्हता.

त्याचं झालं असं, न्यूयॉर्कचा सॉफ्टवेअर इंजिनियर कामानिमित्त अमेरिकेच्या कृषी विभागाची वेबसाईट पाहत होता. अमेरिकेशी मुक्त व्यापारात भागीदार असलेल्या देशांची यादी बघितली, तर त्यात चक्क ‘वाकांडा’ नावाच्या देशाचं नाव होतं.

तुम्ही जर मार्व्हलच्या सिनेमांचे चाहते असाल किंवा ब्लॅक पँथर सिनेमा पाहिला असेल तर आम्ही कोणत्या देशाबद्दल बोलत आहोत हे तुमच्या लक्षात आलंच असेल. ज्यांना हा प्रकार माहित नाही त्यांच्यासाठी थोडक्यात वाकांडा काय आहे ते पाहूया.

वाकांडा हा मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्समधला एक काल्पनिक देश आहे. सिनेमात हा देश आफ्रिकेच्या पश्चिमेला दाखवण्यात आला आहे. ब्लॅक पँथर सिनेमाच्या सुरुवातीलाच वाकांडाचा संपूर्ण इतिहास दाखवला आहे. अॅव्हेंजर्स सिरीजमध्ये देखील या देशाचा उल्लेख आहे.

तर, गोष्ट अशी की अमेरिकेने एका काल्पनिक देशाला आपल्या भागीदार देशांच्या यादीत स्थान दिलं होतं. ही गोष्ट निदर्शनास आणून दिल्यानंतर अमेरिकेने आपली चूक सुधारली आहे. याबद्दल अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्याने माहिती दिली.

काही झालं तरी चूक ही चूक असते. नेटकाऱ्यांनी या गोष्टीचा चांगला समाचार घेतला आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required