computer

तब्बल १५ कोटी रुपयांचं औषध मोफत मिळणार....औषधाबद्दल संपूर्ण माहिती वाचा !!

प्रसिद्ध औषध कंपनी ‘नोव्हार्टिस’ने जगातलं सर्वात महागडं औषध तयार केलं आहे. या औषधाची किंमत आहे तब्बल २.१ मिलियन डॉलर्स. म्हणजे भारतीय चालानाप्रमाणे १४,९३,६८,८०० रुपये. हे औषध पाठीच्या कण्याच्या spinal muscular atrophy आजारासाठी तयार करण्यात आलंय. चांगली बातमी म्हणजे या औषधाचे १०० डोस मोफत वाटले जाणार आहेत.

पाठीच्या कण्याच्या spinal muscular atrophy (SMA) आजारावर उपचार म्हणून  जनुक उपचारपद्धतीत Zolgensma हे औषध दिलं जातं.नोव्हार्टिसतर्फे जून २०२० पासून २ वर्षाखालील मुलांना ५० डोस दिले जातील. २०२० वर्ष संपेपर्यंत या प्रकारे १०० डोस मोफत दिले जातील.यासाठी असे देश निवडण्यात आलेत जिथे Zolgensma ला अजून मान्यता मिळालेली नाही.

spinal muscular atrophy हा आजार दुर्मिळ जनुकीय आजार असून १०,००० मुलांमधून एकाला होतो. या आजारमुळे मृत्यू ओढवण्याची शक्यता असते किंवा अपंगत्वही येऊ शकतं. Zolgensma औषधाला अमेरिकेत मान्यता मिळाली आहे. या औषधामुळे लक्षणे दिसण्यापूर्वीच या आजारावर मात करता येते.

तर मंडळी, १०० डोस मोफत वाटण्याची कल्पना चांगली आहे, पण उरलेल्या रुग्णांना याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required