computer

यूपीमधले गुंड आणि त्यांच्या सर्व्हिसेस.. चार्जेस तर बघून घ्या!!

अडकलेले पैसे, प्रॉपर्टीचा वाद सोडवण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया असते. ज्यांना ही प्रक्रिया नको असते ते लोक कायद्याला फाटा देऊ गुद्याचा मार्ग निवडतात. म्हणजे गुंड मंडळींना सांगून आपले प्रश्न चुटकीसरशी सोडवतात. या कामाच्या बदल्यात ह्या गुंड मंडळींना कमिशन मिळत असतं. 

काही लोकांचा एकप्रकारे हा बिजनेस असतो. पण यूपीत मात्र या प्रकाराने एक वेगळीच उंची गाठली आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही राज्यांचे सर्वेक्षण प्रसिद्ध केले होते. त्यात यूपी गुन्हेगारीत सर्वाधिक पुढे असल्याचं सांगितलं होतं. सोशल मीडियावर फिरणारे यूपीतील एक पोस्टर याच गोष्टीवर शिक्कामोर्तब करताना दिसत आहे. 

यूपीतील एका तरुणाने पिस्तुल हातात धरून एका बॅनरवर फोटो लावलाय. बॅनरवर त्याने आपल्या बिजनसची जाहिरात केली आहे. हा भाऊ विविध प्रकारची सर्व्हिस देतो, या सर्व्हीसचे चार्जेस त्याने पोस्टरवर लिहिले आहेत. या पोस्टरवर असलेल्या सर्व्हीस आणि त्यांचे चार्जेस खालीलप्रमाणे.

खून करणे - 55 हजार रुपये
मारहाण करणे - 5 हजार रुपये
दुखापत करणे - 10 हजार रुपये
धमकी देणे - हजार रुपये 

वरून त्याने टीप दिली आहे की या कामांसाठी जे हत्यार लागतील ते सगळे आमचे असतील, तुम्ही हत्यार उपलब्ध करून देण्याची गरज नाही. आपल्याकडे देशी कट्टा देखील आहे, हे देखील विशेष नमूद करण्यात आले आहे. 

हा तरुण मुजफ्फरनगर जिल्ह्यातील असल्याचे म्हटले जात आहे. पोलीस त्याचा शोध घेत असल्याचे सांगितले जात आहे. सोशल मीडियावर हे पोस्टर चांगलेच व्हायरल झाले आहे. लोक या विषयाची खिल्ली उडवताना दिसत असले तरी जाहीरपणे असे पोस्टर व्हायरल करण्याएवढी गुन्हेगारांची हिंमत होत असेल तर ही गोष्ट निश्चितपणे चिंता करण्यासारखी आहे. एकंदरीत उत्तर प्रदेशच्या कायदा सुव्यवस्थेवरच प्रश्न उभा राहतोय. 

 

आणखी वाचा: 

भारताच्या राज्यांबाबतची सर्वेक्षणे काय सांगतात? कोणतं राज्य आघाडीवर आहे, कोणतं पिछाडीवर ?

 

सबस्क्राईब करा

* indicates required